ईच काउन डोकं भडकते - हास्य कविता
झाडीबोली साहित्य मंडळ
स्पर्धेकरता कविता १५/०५/२०२०
विषय हास्य विनोदी काव्य स्पर्धा
राजेश लक्ष्मण वऱ्हाडे रा कसुरा ता बाळापूर जि अकोला
९९२११२५२३९
ईच काउन डोकं भडकते
सोयरे मायबाप येता विषय
होतो नेहमीच हिचा इच्छेचा अक्षय
येऊन नेहमी मायबापावर अडते
ईच काउन डोकं भडकते
प्रशंसा रोज करतो ईची भांडण्यापेक्षा अबोला बरा
मग शब्द येतात माझ्यावर तुमचं प्रेम नाही ते करा
काय करा चार माणसात शब्द देते आपली उडवते
ईच काउन डोक भडकते
घरात काय कमी नाही पडू देत
तरी तिचे गराणे माय-बाप सांगता येत
ठेचून बसून मारून डोक जाम लढवते
ईच काउन डोक भडकते
आपण येण्याआधी जणू उकरून ठेवते भांडण
माया ममता दूर ठेवते जशी झरे गेले आठुण
सांगितले ते सर्व आना म्हणते पोरांना ही भडकवते
ईच काउन डोक भडकते
उतमात करते किंमत न कोणत्या गोष्टीची
हरामाची जणू समजत मोलमजुरी कष्टाची
आपला राग लेकरावर नसता आपण चांगले बदडते
ईच काउन डोक भडकते
समजुतदारी विश्वास माया ममतेने वागणे
माहेर-सासर दोन्हीही प्रेमाने नाळ बांधणे
आदर्श घ्यावा असे सुन प्रेम सासूचे वाढवते
ईच काउन डोक भडकते
Comments
Post a Comment
Did you like this blog