लॉकडाउन मधली बायको - हास्य कविता
झाडीबोली साहित्य मुख्य समूहाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय हास्य स्पर्धा..
स्पर्धेसाठी
*लॉकडाउन मधली बायको*
काय सांगू लोकहो तुम्हाले
लॉकडाउन मधल्या व्यथा
माझ्याकडून काम करवून घेती
त्याच्यानेच भडकतो माथा....
स्वयंपाक बनविणे, भांडे घासणे
या सर्वाचा माझ्यावर ओझा
कपडे धुणी,पोरांच्या आंघोळी
करण्याचा पडला सारा बोझा....
प्रेमात वागणारी बायको
अशी का वागते माझ्याशी
झोपेत असतांनाच चाय मागते
दम देते आणून दे उशाशी...
जोराने ओरडून सांगते
त्यामुळे येई पोटात गोळा
काम ऐकले तर ठीक म्हणते
नाहीतर रागाने वटारते डोळा....
काम केले तरच मला भाऊ
पोटभर खावाले जेवण देते
अन्यथा पोराबारांसह आम्हाला
उपाशीच रातभर झोपवते....
लॉकडाउन फळा नाही आला
कामाच्या वांद्यात उतरला माज
लॉकडाउन मधली बायको
माझ्यावरच करते आहे राज....
✒️श्री दुशांत बाबुराव निमकर
चक फुटाणा,चंद्रपूर
Comments
Post a Comment
Did you like this blog