सुऱ्या रायला कुवारा - हास्य कविता

स्पर्धेसाठी--

विषय- हास्यकाव्य

शीर्षक- *..सुऱ्या रायला कुवारा*

मास्तर म्हणून काम करते नाव त्याचं सुऱ्या
एक नाही, दोन नाही पोरी पायल्या तेरा..
पयली पोरगी पायतांनी सुऱ्या मोटा लाजे
मनामंदी त्याचा कसा बेंड बाजा वाजे..
पोरगी पाहे सुऱ्याकडं सुऱ्या पायाकडं पाहे
आंगामधून त्याच्या घामाचा लोट वाहे
प्रश्न विचारे मामा आरे लाजते काऊन असा?
अश्या तुह्या वागण्यानं पोरगी समजलं तुले पिसा
रागारागानं सुऱ्यानं पायलं पोरीकडं
पोरगी बोले भलत्याले नजर तिची सूऱ्याकडं
वाटलं सुऱ्याले पोरगी घेत असल त्याची फिरकी
मंग समजलं त्याले पोरगी होती पुरी तिरकी
तवा कोटी कळला त्याले नशिबाचा फेरा...

खोटं काढू काढू सुऱ्यानं पोरी पायल्या बारा
फिरू फिरू शेवटी आता नंबर आला तेरा
तेरावी पोरगी सुऱ्याच्या मनामंदी भरली
पण तेव्हड्यात त्याची कालर एका जनानं धरली
सुऱ्या मने बापाले मी इले नाही सोडीन
बाप म्हणे, सोड बे नाहीतं लवर तिचा झोडीन
सूऱ्याले पुढं बसला मंग जबरदस्त धक्का
आता नाही पायीन पोरी विचार केला पक्का
अशी झाली कथा अन सूऱ्या रायला कुवारा..
एक नाही दोन नाही पोरी पाह्यला तेरा...

                         - *प्रशांत भंडारे*
                           आमडी,बल्लारपूर

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !