छंद - हास्य कविता

हास्य कविता स्पर्धेसाठी 

           *छंद*

मला बाई गाण्याचा भारीच छंद
करू नका कुणी माझे गाणे बंद

गाणे माझे ऐकून पळतात लहान मुले 
म्हातारी कोतारी जागच्या जागी डुले 
डुलता डुलता कधी लुडके कळतच नाही 
गाणे माझे कुणाला मुळी आवडतच नाही

शेजारचे काका आले एकदा घरी
म्हणले मला फारच सुंदर गातेस पोरी
आनंद माझा गगनात मावेनासा झाला 
काकांच्या रुपात जणु मोठा रसिकच आला

काका म्हणले रेडिओसाठी प्रयत्न आहेत माझे
रेडिओवर प्रसारित करावे गाणे बाळा तुझे 
रेडिओवर तू गाणे गाशील जेव्हा 
मुस्कट तरी दाबता येईल रेडिओचं तेव्हा

असे कसे सगळे मला अरसिकच भेटतात
गाणे माझे ऐकून दूर दूर पळतात
मी नाही करणार बाई गाणे माझे बंद
कारण मला मुळी गायनाचा भारीच छंद 

    *सौ अपर्णा सोवळे*
        *यवतमाळ*

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !