प्रेमाचा चहा - हास्य कविता

स्पर्धेसाठी हास्यकाव्य

(झाडीबोलीत)

पिरमाचा चाया

जई पहा ती मालं पाण्यामंदी पायतेस
कुसंगात करुनस्यानी काहा असी वागतेस 

असा काहा सभाव तुजा हेकळवानाचा
जीवाले टोचतेत तुज्या सबदाच्या टोचा
झरते माजा मळका अना तू बाकी हासतेस...

इसरुन गेलीस तईचे तू पिरमाचे बोल
तू येक्याजागी उबी अना माजा गेला तोल
मालं सोळून देतेस ना पाया त्याज्या पळतेस...

तुज्यासंगा बोलना मालं बहुभारी पळते
राग तुजा आवरना जीव माजा मळमळते
मी सांगतो येक अना तू भल्तेस आयकतेस...

तू काईच्याबाई बोल्तेस,तुलं नसे आठ्ठोन
तुजे सप्पे लप्डे ठेवलू मनामंदी साठ्ठोन
मी नाई भुलं कईच,मंग तू काहा भुलतेस...

कसा पाजूवं तुलं मी पिरमाचा चाया
आतंवरी सांगलू थो सप्पा गेला वाया
डोक्स्यात नाई बरं,हिरदयात कई
भरतेस...

अनिल पिट्टलवार ग्रामगीताचार्य
 भद्रावती जिल्हा चंद्रपूर
 9850492877

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◾कविता :- नवरा माझा

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

खगोल शास्त्रातील मराठी साहित्य - Knowledge