बाळंतपण - हास्य कविता
झाडीबोली साहित्य मंडळ
हास्य काव्य स्पर्धा
दिनांक १५-५-२०२०
विषय - हास्य विनोदी काव्य स्पर्धा
स्पर्धेसाठी
शीर्षक बाळंतपण
सुरू झाली अचानक मळमळ,
पोटात माझ्या आली कळ ,
दारासमोर ॲम्बुलन्स आली,
सगळ्यांची धावाधाव झाली,
घरच्यांनी नेलं डायरेक्ट ससून,
डॉक्टरांनी सांगितलं मला तपासून,
गोड बातमी आहे म्हणाले,
माझे डोळे पांढरे झाले,
माणसाला कसे दिवस गेले?
आई म्हणाली तुला मूल व्हावे म्हणून मी नवस केले,
माझ्या सर्वांगाला फुटला घाम,
कोणी म्हटले मुलगी झाली तर सीता, मुलगा झाला तर राम,
मी बायकोला म्हटलं हे असं कसं झालं,
गरोदर होण माझ्या नशिबी आल,
म्हणता म्हणता नऊ महिने झाले,
अन् ऑपरेशन थिएटरला मला ॲडमिट केले,
तिथे दिवे सारे ऑन झाले,
अन् मला चटके बसू लागले,
बायको म्हटली उठा आता तोंडावर ऊन आले,
डोळे उघडून बघतो तर सारे मला हसू लागले,
बायको म्हटली काय हे आळशी,
कामधंद्याच बाजूलाच राहिलं,
तुम्हाला सांगतो माझ्या बाळंतपणाचं स्वप्न
मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं.
स्पर्धक - भरत नारायण बारी
पत्ता - बिजलीनगर,चिंचवड,पुणे.
मोबाईल - 9028505164
Comments
Post a Comment
Did you like this blog