खुला करा न् जी लाॕकडाऊन - हास्य कविता

हास्य काव्य स्पर्धा आयोजित ...
हास्य /विनोदी काव्यलेखन !
          दि.  १५ मे २०२०
------------------------------------
स्पर्धेकरीता हास्य कविता..  
  ( झाडीबोली भाषेत....)
------------------------------------

!! खुला करा न् जी लाॕकडाऊन !!
     """""""""""""*****"""""""""""""

बोंबलू-बोंबलू सांगत होती
बायरं नोको निंगू ,बायरं नोको निंगू
आयकनं कसा व्ं ? थो नवरा हो..
गेला बायरं ! पोलिसांनी बदडले -पाठीवर दांडू.

बेससं झोंबला असनं व्ं बाप्पा !
रायते-रायते न् अण्णा ! अण्णा !! म्हणते..
शेकून देते न् वं चांगलीस तेल पाणी
तरी बाप्पा ! डोरे वटारुन पायते .

म्हणली होती लाडीगोडीनं...
घरात राऊन् ,घरात खाऊन्
त् येलपाड्या.. म्हणे बाप्पा !
चूप रायतेस ? का कानफटात देऊ ?

दोनक्ं हप्ते बाई...
कसा तरी रायला असनं व्ं घरी
मंग म्हणे- खर्रा, तंबाकाशीवाय 
माज्या जीवाले करमत नाही.

ताव आणेन् व्ं राजासारखा...
म्हणे..माले कोणो व्ं काहो करते !
हयर्रा - गयर्रा समजलीस का ?
माज्यासारखा माणूस घरात रायते ?

खाऊन आला मार बाई,सुजली पाठ बाहेरुन            माले म्हणते आता,तंबाकू मांग व्ं शेजारुन
तरास माज्या जीवाले,मालीस करुन करुन 
खुला करा न् जी, हा लाॕकडाऊन !!

        @ नागेंद्र डी.नेवारे
             मूल जि.चंद्रपूर
     मोबा क्र. ९७६४२७१५६२

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !