बायकांच लाॅकडाउन - हास्य कविता

हास्य काव्य स्पर्धेसाठी कविता 
दि.15 05 2020

बायकांच लाॅकडाउन

या लाॅकडाउनने सा-या
बायका लागल्या चिडायला
दिवसभर काम करून 
रात्री येती रडायला 

उठलं की झाडू हातात
केर लागती काढायला 
लाद्या पुसून यांची
कंबर लागते मोडायला 

चहा नाश्त्यासाठी सगळे 
टाहो लागती फोडायला 
या उभ्याच किचनमधे 
भाकरी पोळ्या बडवायला

दिवसभर खाण्याची चंगळ
भांडी लागतात पडायला 
यांच्या येई जीवावर मग
खरकटं काढायला 

राग आला सा-यांचा की
धरते धूण्याच्या दगडाला
बदा बदा सा-यांचे
कपडे लागते बदडायला

कामं आवरून सारी
जरा जाते पडायला 
आज काही नवीन कर
पोरं लागती ओरडायला 

पडल्या पडल्या मग
मोबाईल लागते उघडायला 
नव नवीन रेसिपीज
लागते ती सापडायला

किचनमधे होतात सुरू
नवीन प्रयोग घडायला
काही जमतात पदार्थ 
काही लागतात बिघडायला

जमलेल्या पदार्थांचे
फोटो लागते काढायला 
वरचेवर पदार्थांचे
स्टेटस लागती पडायला 

ब्यूटी पार्लर किट्टी पार्टी 
स्वप्ने लागती पडायला 
वाट पाहते मनोमनी 
लाॅकडाउन उघडायला 

सौ.मंजूषा सुंदर लटपटे
पुणे
9923035503

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◾कविता :- नवरा माझा

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कविता :- मी कुणाला कळलो नाही | ✍️सुरेश भट ...