भविष्याचा वेध घेणे शक्य आहे का ?

भविष्याता गोष्टींचा वेध घेणे नक्कीच शक्य आहे. मात्र वेध घेणे आणि भविष्य जसेच्या तसे वर्तवणे यात फरक आहे. म्हणजे काही वर्षात माणूस मंगळावर वस्ती करेल असा वेध तुम्ही घेऊ शकता, मात्र नेमक्या कोणत्या तारखेला करेल, किती प्रयत्नात मंगळावर जाईल, किती मृत्यू त्यात होतील या गोष्टी तंतोतंत आपण सांगू शकणार नाही.

भविष्याचा वेध घेण्यासाठी वर्तमान परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे गरजेचे असते, आजच्या गरजा व समस्या आपल्याला भविष्यावर परिणाम करणाऱ्या असतात. जेव्हा त्याचा अभ्यास आपण पुरेपूर करू तेव्हा नक्कीच भविष्याचा अचूक वेध घेता येतो. आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांनी शेकडो वर्षे भविष्याचा वेध घेऊन पाऊले उचलली व जवळजवळ संपूर्ण जगावर राज्य केले.

आणखी उदाहरण घ्यायचे झाले तर फ्रेंच लेखक जुल्स व्हर्न यांनी फ्रॉम द अर्थ टू द मून हे पुस्तक १८६५ मध्ये लिहले होते. त्यावेळेस ना कुठला शोध लागला होता ना माणसाकडे काही साधने होती, तरीही या लेखकाने चंद्राच्या प्रवासावर अचूक वर्णन केले होते जे शंभर वर्षांनी माणसाने सत्यात उतरवले.

त्यामुळे अफाट ज्ञान मिळवले आणि अचूक मोर्चेबांधणी केली की भविष्याचा वेध आपण नक्कीच घेऊ शकू.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...