◼️हास्य कविता :- हत्ती दादा
स्पर्धेसाठी - बालकाव्य
*हत्ती दादा*
हत्ती दादाला लागली
जोराची भूक
इकडे तिकडे पळाला
तो खूप खूप
तेवढ्यात दिसले
पोते मोठे
चण्याचे होते ते
भरलेले साठे
पोतेभर चणे
खाल्ले गपागप
जंगलात गायब झाला
तो झपाझप
पोटात चण्यांनी मग
मांडला धुमाकूळ
गुडगुड पोटात
उठला पोटशूळ
भल्यामोठ्या पोटात
साठला वात
धुमधडाम आवाजात
घालवली रात
जंगलभर पसरला
चण्यांचा वास
लाजेने मेले हत्तीदादा
खाऊ चणे घास
*सौ संगीता माने*
Comments
Post a Comment
Did you like this blog