◼️ हास्य कविता :- उपाय ...✍️शामला पंडित
उपाय
◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆
मनाला लागली हुरहूर
वाढे वजन वय भरभरून
शोधले उपाय कित्येक
सदा राहण्या चिरतरुण ॥१॥
सकाळ संध्याकाळ नेमे
शतपावली,व्यायाम पळापळी
चार-सहा फळांचे रस घेई
व्यायामानंतर प्रत्येकवेळी ॥२॥
सकाळी नाश्ता ,चहा
सात्विक थाळी तीन वेळा
आहार कमीत कमी केला
फलाहार मात्र चारदा वेगळा ॥३॥
जिभेवर नियंत्रण म्हणून
बोलणे ही केले कमी
पोटावर पट्टा घालतेय
बारिक दिसण्या नेहमी॥४॥
श्वास आलोम विलोम
सूर्यनमस्कार करी सहन
असे किती केले उपाय बाई
कमी होता होईना वजन ॥५॥
रामदेवबाबा पतंजली काढा
बालाजींचे वैद्दिकी घेऊन
ऋषाली व्यायामशाळा
सारेच गेले माझ्यापुढे थकून ॥६॥
◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆ .
सौ. शामला पंडित ( दीक्षित )
पूर्णानगर, चिंचवड
7276866795
◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆◇◆◆
Comments
Post a Comment
Did you like this blog