वेसन - कविता

1.

मनास ठेवण्या काबूत
पहिली बांधावी त्यास वेसण 
योगसाधना,ध्यानधारणा करुन
जगावे आरोग्यमय जीवन

गुराढोरांना ठेवण्या काबूत, 
नाकात बांधतात दोरीची वेसण  
हुंदडणाऱ्या बैलमनावर करावे
लागते तसेच सुसंस्काराचे शिंपण

जेव्हा सैरवैर चोहीकडे भरकटत 
रहाते आपले वढाळ अस्वस्थमन 
तेव्हाच समाजात अन्याय,अत्याचाराचे 
घडते धुंवाधार प्रदर्शन

अश्लील,हीन कुविचारांनी जेव्हा 
आपले ग्रासले जाते तनमन
त्याला काबूत ठेवण्यासाठी
अंगिकारावा सकारात्मक दृष्टिकोन

आजच्या भावीपिढीवर जेव्हा विद्यार्थीदशेतच 
आत्मनिर्भर सद्विचारांचे घालू आपण वेसण 
तेव्हाच ही भावीपिढी होईल आत्मनिर्भर 
अन् सुसज्ज होतील करण्या स्वतःचे आत्मपरीक्षण 

सौ.रेखा बांदल, पुणे.
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.


2.

मनाचे द्वंद् माझ्या मला न कळले
म्हणून माझ्याविरुद्ध त्याने बंड पुकारले

चंचल मन हे झरे वाहती वाट मिळेल तिकडे
आता जमिनीवर तर लगेच क्षितिजा पलिकडे.....
..
त्यांच्यामते,भावना त्याच्या मला कळतं नाही
कळल्याचं तरी फारसे वाव देत नाही

वाढत वय माझं तो स्वीकारत नाही
त्याचं सुसाट पळण, मला पटत नाही.....

वय चाललंय  भविष्याकडे
मन पळतय भूतकाळकडे

म्हणून केलंय  मी त्याला  नजरबंद
चुकताच नजर माझी पळतो धुंद.....

चंचल मन ते आवरता आवरत नसे
उनाड वय चाळीशी चे गिरवितो मलाच धडे

वेसण घालून  डांबलय त्याला दार
हृदयाचे  करून बंद
म्हणून पुकारलाय त्याने माझ्याविरुद्ध बंड.
        
   *सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*


3.

वेसण घालून बघ
मग कळेल दुःख
तोंडावर बंधन
कसे असेल सुख

मुकं जनावर
होतं अनावर
काय उपाय
याच्या बंधनावर

वेसन तर वाईटाला
घालायला हवं
चांगुलपणा टिकून
शिकूया नवं

आचारांना वेसन
विचारांना कधी
बोलक्या पुढा-यांना
मौनात बांध कधीमधी

वेसन जुन्या रूढी परंपरांना
नव्या पिढीच्या वर्तनांना
समानतेच्या विचारांना
दूर लोटणा-यांना,

*कविता बिरारी नाशिक © मराठीचे शिलेदार समूह सदस्या*



4.

मुका जनावर म्हणून घालतात मला वेसण
कसे व्यक्त करू मी माझे दु:खाचे कथन

वेसण घालतांना होतात रे वेदना
तरी तुझ्याचसाठी  सहन करतो यातना

घाव तुतारीचा सहन करून येते शिवारी 
ऊन वारा पाऊस झेलते मी अंगावरी

असते मी सदा खुटाच्या दावणीला बांधलेला
आणि तू रे माणसा सदैव मोकाट  सुटलेला

तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी होते रे सहभागी
तरी माझ्या भावनांशी खेळतात सारे मी रे अभागी

एकाच दिवशी करतात माझा गजर
आणि इतर दिवशी देतात लाठीचा मार

शीण होताच माझ्या तू या देहाला
दोनपैशासाठी करतोस रे हवाली कसाईला?

अरे स्वार्थासाठी येथे  टिपून बसले आहेत लोक
अरे माणसा माझ्यासारखा नाही कुणीच प्रामाणिक..


 *सुधा अश्वस्थामा मेश्राम*
 *अर्जुनी/मोर.गोंदिया* 
 *सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*



5.

वेसण घालून साक्षरतेचे 
दूर करुन अज्ञानाचा अंधार
ज्ञान प्रबोधन करून मनाचे 
नवीन पिढीला करू या साकार 

वेसण घालू भेदभावाचे
मुलांमुलींमधील सद्भावाचे 
मुलगा आहे वंशाचा दिवा तर
मुलगी आहे पणतीचा प्रकाश बरं

वेसण घालू संस्काराचे
मिळेल फळ मगं रसाळ गोमटे 
उज्ज्वल भविष्य घडवू मुलांचे 
 कोणीही बोलणार नाही खोटे 

वेसण घालू योग, प्राणामयाचे 
निरामय आरोग्य देऊ कायमचे 
बालक आणि पालक सुदृढता
जीवनाची हीच आवश्यकता

वेसण घालू मान अपमानाचे
कुटुबांप्रती प्रेम आपुलकीचे 
बांधून ठेवूया रेशीमगाठीने
जिव्हाळा अन् मायेच्या आठवणीने

सौ .आश्विनी सुहास मिश्रीकोटकर औरंगाबाद

©️ सदस्या मराठीचे शिलेदार समूह



            असेच लेख.          
वाचण्यासाठी आमचा ब्लॉग
         फॉलो करा              


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !