दूरदृष्टी - कविता

( येणाऱ्या भावी भविष्यासाठी आजची दुरदृष्टी ही खूप महत्त्वाची असते , अशीच एक खालील कविता. )

दुरदृष्टी ठेवून प्रत्येकाने
लावा एकेक झाड
तरच येणार्या संकटावर
करता येईल मात

वृक्षतोड झाली चहुकडे
प्रदुषण वाढले बहू
समतोल साधण्या निसर्गाचा
एकेक झाड लावू

प्राणवायुचे घटते प्रमाण
वृक्षतोडीमुळे फार
भविष्यात जगणे कठीण
करा थोडा विचार

कधी अवर्षण,कधी अतिवर्षण
असमतोलाचे हे कारण
जलसंपत्ती वाचविण्यास
निकडीचे आहे वृक्षारोपण

सजीव जीवनात वाढले
धोके विविध आजारांचे
निरोगी राहण्या जीवन
वृक्षसंवर्धन आहे निकडीचे

जीवसृष्टीला विनाशाकडे
जाण्यापासून थांबवा
राखण्या निसर्गाचा समतोल
झाडे लावा,झाडे जगवा

कवयित्री :
कु.सुलोचना मुरलीधर लडवे
साईनगर,अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह


( एक टीप : सदर कविता मराठीचे शिलेदार कविता संग्रह या समूहातून घेतली आहे . कवितेचे सर्व हक्क कवयित्रीच्या स्वाधीन)

आमच्या वेबसाइटवर तुमची कविता टाकण्यासाठी खालील व्हाट्सअप वर सेंड करावी व्हाट्सअप नंबर ला टच करा


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा

◾ललित लेख :- स्ञी

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◼️ ललित लेख :- सरपंच कसा असावा ?

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !