आनंद म्हणजे नेमके काय? तुम्ही सर्वात आनंदी केव्हा किंवा कशात होता?

संसारिक आनंद मिळाला की माणूस खुश होतो… नव्हे तर तो त्याचा आनंदच असतो; काही अनपेक्षितपणे मिळाले तर त्याचा आनंद द्विगुणीत होतो कारण त्याला ते मिळणं अनपेक्षित असतं, याला म्हणायचे स्वानंद, कारण तो अति खुश असतो. पण जेव्हा माणसाला असा आनंद मिळतो की तो नाचू शकत नाही, हसू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही आणि फक्त तो आनंद गहिवरून अश्रू गाळीतच व्यक्त होतो. त्या आनंदाला काय म्हणायचे? अर्थात तोच खरा “परमानंद” हा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा की कोणती असाध्य गोष्ट त्याला हाती आलेली दिसते… तेव्हाच जेव्हा, कधीतरी माणूस स्वतःच्या विचारांमध्ये गुंतला असतो आणि एखादी आंतरिक इच्छा त्याला सतावते व तो ईश्वरचरणी पूर्णतः एकाग्र होऊन विलीन होतो. व नकळतच एखादं फुल देवावरचं, डोळे उघडल्या नंतर पडलेलं दिसतं… एक आशीर्वाद रुपात. त्या क्षणी त्याला जे गहिवरून येतं, अथवा डोळ्यातून अश्रुधारा गळतात तेव्हा त्याला विचारून पहा… तो आनंद व्यक्त करू शकतो का? तो आनंद फक्त अनुभवत असतो… याच आनंदाला म्हणायचे “परमानंद” – आणि हाच आनंद पहिल्या दोन आनंदापेक्षा मोठा आहे,सर्वात वरचा आहे नव्हे तर परम आहे, कारण तो वर्णवूच शकत नाही म्...