एक प्रसिद्ध नादर शहाचा किस्सा एकदा नक्की वाचा

 Preserve Your Individuality:-

.................................................................


व्यक्ती, मग ती एखाद्या राष्ट्राची अध्यक्ष असो की नेता की सामान्य नागरिक, प्रत्येकाने स्वत:ची अशी खास प्रतिमा तयार केली पाहिजे. एखादा सैनिक त्याच्या जवळच्या लष्करी शिस्तीचा वापर करून स्वत:च्या खास पद्धतीने येणाऱ्या संकटांचा मुकाबला करून प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढत असतो. Channing या तत्ववेत्याने म्हटले आहे :-“ No man should part with his own individuality and become that of other.” स्पर्धेच्या जगात वावरणाऱ्या प्रत्येकाने याचे भान ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या परीक्षेत यश मिळवून अधिकारी बनताना त्याच परीक्षेत पूर्वी यशस्वी झालेल्या उमेदवारांचे अनुकरण अवश्य करावे पण त्यावेळी स्वत:चे स्वत्व गमावले जाणार नाही इकडे लक्ष द्यावे. पुढील एका उदाहरणातून त्याचे महत्व स्पष्ट होईल


  नादिरशहाने दिल्ली जिंकल्यानंतर त्याच्या सेनापतीने त्यास विचारले, “ खुदावंत , आपण हिन्दुस्थानच्या बादशहाच्या दिल्ली शहरातील प्रत्येक रस्त्यावरून व गल्लीबोळातून विजयी मिरवणूक काढूया का ? ” यावर बादशहा म्हणाला, “ ठीक आहे, जर त्याने तुम्हा सर्वांना आंनद होणारा असेल तर आपण नक्कीच विजयी मिरवणूक काढूया “ नादिरशहाची संमती मिळाल्याबरोबर त्याच्यासाठी दिल्लीच्या हत्तीखान्यातून एक देखणा आणि अजस्त्र हत्ती आणण्यात आला. तो सजवल्यानंतर नादिरशहाने विचारले, “ या हत्तीवर आता मी कसा बसणार ? याच्यावर बसणे घोडयावर बसण्यासारखे सोपे नक्कीच दिसत नाही.” यावर त्याचा सेनापती, “ काही काळजी करू नका महाराज हत्तीचे सोंड धरून आपण आरामात त्याच्यावर स्वार होऊ शकता ” नादिरशहाला ही कल्पना आजिबात आवडली नाही. तरीही सेनापतीच्या समाधानासाठी तो त्या हत्तीच्या सोंडेवरून त्याच्या पाठीवर चढला आणि म्हणाला, “ आता तुम्ही या हत्तीचा लगाम माझ्या हातात द्या “  नादिरशहाचे हे उद्गार ऐकून त्याचा सेनापतीला हसू आले, तो म्हणाला, “ महाराज हत्तीला लगाम नसतो. हत्तीस्वारीवर नियंत्रणासाठी माहुताकडे अंकुश असतो. ज्याप्रमाणे रथ हाकण्यासाठी सारथी असतो, त्याचप्रमाणे हत्तीस्वारीसाठी माहूत असतो.” यावर बादशहा म्हणाला ,” म्हणजे माझ्या हालचालीसाठी मला माहुताची गरज पडणार.  तसेच मला जर युद्धभूमीवर जायचे असेल तर, मला त्या माहूतावर अवलंबून राहावे लागणार. त्यापेक्षा मी घोड्यावरच स्वार होतो. मला तुमचा हत्ती आजिबात नको.” आणि त्याने हत्तीवरून पटकन उडी टाकली उतरल्यानंतर सेनापतीस दरडाहून नादिरशहा म्हणाला, “ सेनापती नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की नादिरशहा कधी कोणावर अवलंबून राहत नाही आणि तेच त्याच्या व विजयाचे खरे गमक आहे.”

लेखक:अनामीक

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...