आनंद म्हणजे नेमके काय? तुम्ही सर्वात आनंदी केव्हा किंवा कशात होता?

संसारिक आनंद मिळाला की माणूस खुश होतो… नव्हे तर तो त्याचा आनंदच असतो; काही अनपेक्षितपणे मिळाले तर त्याचा आनंद द्विगुणीत होतो कारण त्याला ते मिळणं अनपेक्षित असतं, याला म्हणायचे स्वानंद, कारण तो अति खुश असतो. पण जेव्हा माणसाला असा आनंद मिळतो की तो नाचू शकत नाही, हसू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही आणि फक्त तो आनंद गहिवरून अश्रू गाळीतच व्यक्त होतो. त्या आनंदाला काय म्हणायचे? अर्थात तोच खरा “परमानंद”

हा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा की कोणती असाध्य गोष्ट त्याला हाती आलेली दिसते… तेव्हाच जेव्हा, कधीतरी माणूस स्वतःच्या विचारांमध्ये गुंतला असतो आणि एखादी आंतरिक इच्छा त्याला सतावते व तो ईश्वरचरणी पूर्णतः एकाग्र होऊन विलीन होतो. व नकळतच एखादं फुल देवावरचं, डोळे उघडल्या नंतर पडलेलं दिसतं… एक आशीर्वाद रुपात. त्या क्षणी त्याला जे गहिवरून येतं, अथवा डोळ्यातून अश्रुधारा गळतात तेव्हा त्याला विचारून पहा… तो आनंद व्यक्त करू शकतो का?

तो आनंद फक्त अनुभवत असतो… याच आनंदाला म्हणायचे “परमानंद” – आणि हाच आनंद पहिल्या दोन आनंदापेक्षा मोठा आहे,सर्वात वरचा आहे नव्हे तर परम आहे, कारण तो वर्णवूच शकत नाही म्हणजेच जो अवर्णनीय आहे जो फक्त पुनःपुन्हा आठवल्यांनी द्विगुणीत होत असतो तोच खरा आनंद म्हणजेच “परमानंद”.

हाच आनंद माणसाला जीवना पलीकडे काय या कडे बघण्याची दृष्टी देतो. त्याला मग दैनंदिन जीवन थोडं शुल्लकच वाटतं. त्याला पुढे काय याचीच ओढ लागते.

माणूस सर्वसाधारणतः जप करतो, पण जपात लक्ष नाही लागत कारण प्रापंचिक कामाचा विचार सतत मनी असतो. “फक्त संख्यावारी “लक्ष“ जप करतो, पण “लक्ष” जपात नसतं”. पण ज्यावेळेला एखादा दैवी अनुभव त्याला येतो तेव्हा माळेचा प्रत्येक मणी हा ईश्वराचे तितक्या वेळेला पाय पकडल्याचा अनुभव देतो आणि पुन्हा प्रत्येक मण्या बरोबर तितके अश्रूही थेंबरुपी डोळ्यावाटे गळत असतात. हाच खरा त्याच्या चरणी केलेला प्रेमरूपी अभिषेक असतो. कसा शब्दित करणार हा आनंद? इथूनच त्याची आंतरिक जीवनाची सुरवात होते, तो थोडं अंतर्मुख व्हायला लागतो. कारण त्याला स्वतःचा जग आता मिळालेलं असतं आणि बाहेरच्या जगाला अर्थात ज्यातच तो वावरत असतो, त्याला तो स्वच्छेनेच दूर सारायला लागतो.

ते एकाकीपणच त्याला आपलं ब्रम्हांड वाटत असतं. आणि जेव्हा तो पूर्णतः नामस्मरणात एकरूप होतो, तेव्हा त्याला देव नाही, कोणती मूर्ती नाही, फक्त एक शून्य नजरेत येतं आणि त्या शून्यातच त्याचं सर्वस्व त्याला दिसतं. हीच त्याची आंतरिक जीवनाची पहिली पायरी असते. तो त्या क्षणी जेव्हा त्या शून्य वालयाशी एकरूप होतो, आणि स्वतःच देव असल्याचा अनुभव करतो, तीच स्तिथी त्याची प्रणायामित स्तिथी असते. अर्थात याच स्थितिला म्हणतात “अहं ब्रम्हास्मि”.

लेखक : अज्ञात
स्त्रोत : उत्तर ऍप  

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !