देशी देशी झालो मी उपाशी - हास्य कविता
*देशी देशी झालो मी उपाशी* 😂😂
*देशी देशी मी*
*झालो उपाशी*
*दारु बंद झाल्यापासून*
*मले डॉक्टर येऊन तपाशी* !!
*डॉक्टर मने बायको ले*
*येंचा आंगात कमजोरी आली*
*बायको मने तसगिस*
*काई नाई याची दारु बंद झाली* !!
*देशी पोटात असल्यावर*
*होतो मी राजा*
*काय सांगू गड्या ह्या*
*कोरोना न देल्ली मले सजा* !!
*मोठ्या मुश्किल न सरकार*
*न दारु सुरु केली*
*एक काटर प्यायचा जागी*
*भाऊ मी ४ काटर पेली* !!
*रस्तावरचे लोक म्हाया*
*सन्मान करु लागले* .
*काही जन त हार*
*टाकुन पाया लागले* !!
*दारु बंद झाल्यापासून बेकार*
*होती आमची बेवडयांची अवस्था*
*दारु सुरु झाल्यावर सुधरवली*
*आम्ही अर्थव्यवस्था*. !!
*रस्त्यावर पडलो होतो*
*गल्लीतल्या पोट्यांयन*
*आनल घरापाशायी*
*देशी देशी मी झोपलो उपाशी*. !!
*रस्त्यावर झोपल्यावर माया*
*सपनात एेश्वर्या आली*
*जाग आल्यावर पायतो*
*त कुञे आंगावर भुकु लागली*.!!
*गल्लीतले लोक माया ईकडे*
*सन्मानान पायत होती* .
*हाच तो अर्थव्यवस्थेचा*
*कणा म्हणुन गर्वाने सांगत होती* !!
*हे एेकुन भाऊ मले*
*मोठा गर्व झाला*..
*देशासाठी देलेल योगदान*
*पाऊन माया डोयात रड आला*!!
*दारु सुरु केली म्हणुन मी*
*सरकारचा धन्यवाद देतो* .
*सरकार देललेल्या पाचशे रुपयात*
*मी देशीची काटर घेऊन पेतो* !!
*दारु पेल्यावर जाते माया*
*नाकातोंडात माशी*
*देशी देशी घरात*
*बायको लेकर उपाशी* !!
✍ *कवी*
*मयुर रविंद्र गायकवाड*
*ता, जि अमरावती*
Comments
Post a Comment
Did you like this blog