◼️ कविता :- धरू नको भीती मानवा
भिती
नको धरू भिती कशाची अरे तू मानवा
आहे देव पाठीशी वधीतो नित्य जो दानवा
प्रिती हरीची बाळग मनी तू सदा
येऊ दे संकट वा कशीही ती आपदा
भक्तावरी सदैव लक्ष ठेवून तो असतो
जरी आपणास प्रत्यक्ष असा तो ना दिसतो
भिती ठेवून मनी यश न कधी रे लाभे
विश्वास ठेव निढळ प्रभूवर तो निवारील प्रेमभावे
निर्भय होऊन जगी जगणे हेच असते खरे
प्रभू असता पाठीराखा अन्य कोण छळेल बरे ?
भक्तीभावे पूजाअर्चा नित्य करता प्रभूची
खचित दैन्य दुःख निवारील खूणगाठ बांध मनाची
🙋🏼♂👆🏼✍🏽🙏🏼
शरदकुमार सुमन -ज्ञानेश्वर वेदपाठक
( मंद्रुपकर ) सोलापूर
Comments
Post a Comment
Did you like this blog