माहिती :- जांभई देण्याचे फायदे
दररोजच्या जीवनात आपण 'जांभई' देतांना इतरांना पाहतो. तसेच 'जांभई'चा अनुभव आपण स्वत:ही घेतलेला आहेच म्हणा. 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. मात्र ही जांभई येण्याचे कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना!
एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय.
' जांभई' का येते? याचे मागील कारण शोधून काढण्यासाठी अभ्यासकांनी पोपटांवर परीक्षण केले होते. त्यांनी परिक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण व सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवले.
कमी व सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मात्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचे त्यांच्या निदर्शणास आले.
त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा सामान्य तापमानात असतो तेव्हा आपल्या मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला जांभई येत नाही. त्याचप्रमाणे थंड वातावरणातही आपल्याला जांभई येत नाही.
मात्र उष्ण वातावरणमध्ये आपला मेंदू तापत असल्याने आपल्याला जांभई येते. झोप येण्याआधी व झोपेतून उठल्या- उठल्या मेंदूला योग्य तापमानात आणण्यासाठी आपल्या जांभई येत असते.
Comments
Post a Comment
Did you like this blog