◾कविता :- शहाणपणा म्हणजेच मॅच्युरीटी
शहाणपणा म्हणजेच
मॅच्युरीटी
मॅच्यूरिटी नाही तुझ्यात
खूपच जण म्हणतात
पण ते प्रत्येक गोष्ट
पैशामध्येच मोजतात
मी पण न्याहळतो बरं का
त्यांच्यातली मॅच्यूरिटी
पण बाजार केवळ पैशाचा
नाही प्रेमाची प्युअरीटी
गोड बोलावं हसून
घ्यावं समोरच्याला समजून
सुखदुःखात सर्वांच्या
जावं पूर्ण समरसून
आई वडील पत्नी
सगळ्यांशी आदरानं वागावं
आपलं आगाऊ वागाणं
कधी ना दिसावं
मुलं बाळं सारी
देवाघरची फुलं
ऊत्तम आचार विचारांचे
शिंपावे पवित्र जल
प्रगती व्हावी सर्वांची
याचाच ध्यास हवा
अणू इतकाही त्रास
कुणासही न व्हावा
मॅच्यूरिटी मॅच्यूरिटी
दुसरं असतं हो काय
परस्परांशी ऊत्तम वागावं
सुखी जीवनाचा ऊपाय
🤷🏽♂️🤝🏼👍🏼☝🏼
केशीराज ...
शरदकुमार सुमन -ज्ञानेश्वर वेदपाठक
( मंद्रुपकर )
सोलापूर ..
Comments
Post a Comment
Did you like this blog