नाते :- जीवनातील महत्वाचा भाग

 

❤️❤️ नाती  ❤️❤️

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होत ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच...

भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. त्यांची एखादी कृती, चूक हा जणू काही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळलंच नाही. नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही, तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते.

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होत....

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो...

भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो.

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला नंतर दिली तरी त्याच दुःख म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं....

जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं तर त्या जगण्यालाही स्वतःच असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं....

कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती लोक आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अजून सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं असं मात्र नक्कीच वाटून जातं....

क्षणभंगुर आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपण राखायला हवा आणि ह्यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि जोपासना करणं आणि अहंकारामुळे त्यांना न गमावणे हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं...

बऱ्याचदा  तर समोरच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो..

परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो.. आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही..


म्हणून......


कुणाची कितीही मोठी चुक असली तरी ती आयुष्यापेक्षा नात्यापेक्षा मोठी निश्चितच नाही...!!

______________________________________

प्रिय मित्रानो, जगात कोणीच अमर नाही । मित्रांनो आपलं पूर्व जन्माचं काही तरी ऋण असल्यामुळे ह्या जन्मी आपली भेट झाली आहे आपण कोणी इथून काहीच घेऊन जाणार नाही म्हणून नात्याला महत्त्व द्या

तुम्हाला माहीत असेल नसेल जगात सात अब्जाच्या घरात  लोकसंख्या आहे. आपली ओळख त्यांच्यातल्या फक्त दोन ते पाच हजार लोकांसोबत असते.

नाते जपा | नाते कमवा

---------------------------------------------------------------


🌸💐🌸💐🌸

वरील पोस्ट आवडल्यास कमेंट मध्ये कळवा आणि इतरांना आपल्या परिवाराला, आणि तुमच्या सर्व आवडत्या व्यक्तींना पाठवा 

Comments

Post a Comment

Did you like this blog

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !