◼️ कविता :- कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा
अश्विन मास पौर्णिमा
चंद्र देखणा हसला
सा-या तारकां सोबत आला
लख्ख प्रकाश पडला
खरा दुग्ध शर्करा योग
कोजागिरीला आला
लहान थोर सारे खुषीत
परिवार एकत्र जमला
गप्पा गोष्टीत रमती
मसाला दुध आटवती
चंद्राचे प्रतिबिंब पाडूनी
नैवेद्य लक्ष्मीस दाखवती
रास क्रीडा खेळताना
देवाचे गुणगान करतात
भक्ती भावाने धुंद होता
मसाला दुध फस्त करतात
कोजागिरी पौर्णिमेला
दुधात उतरते शीतलता
मसाला दुध पिऊनी
मनाला मिळते शांतता
__________________________________
कवयित्री : सौ विजया शिंदे
कल्याण
__________________________________________
Comments
Post a Comment
Did you like this blog