◼️ वैचारिक लेख :- जग इतकं का बदलत आहे...

काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते कि, जग बदलत आहे"

पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात... मिरचीने तिखटपणा नाही सोडला.. आंब्याने गोडपणा नाही सोडला.... वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला.... वृक्षांनी सावली देणे नाही सोडले.... सुर्याने तळपणे नाही सोडले..... चंद्राने शीतलता नाही सोडली..... फुलाने सुगंध नाही सोडला.... वा-याने वाहाणे नाही सोडले..... नदीने आपला मार्ग नाही बदलला..... सागराने आपली मर्यादा नाही सोडली..... पक्षांनी विहार करणे नाही सोडले.... निसर्गाने कोमलता नाही सोडली.... ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला...

मग नेमके बदलले आहे ते काय?, बदलला आहे तो फक्त माणूस.... माणसाने माणूसकी सोडली.

श्रृष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्त्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलीयुगातही तशीच आहे

बदलला आहे केवळ माणूस आणि त्याचे विचार, पण तो मात्र साऱ्या जगाला तो दोष देत असतो....

 माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत. तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका

 समाधानी रहा सर्वांचे आभार माना

Comments

Popular posts from this blog

कविता :- आतुरता

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

◾जीवन परिचय :- राम गणेश गडकरी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

जिवन विचार - 52