◼️ कविता :- खरे काय ?..
खरे काय ?
विज्ञानाने ज्ञानापेक्षा
अज्ञानाचा व्यापार केला
लक्ष्मीप्राप्तीसाठी इथे
शारदेचा बाजार केला ।
किती लुटावे रुग्णाला ते
करार येथे पक्के झाले
आयुष्याची कमाई लाटून
वाटणीचे टक्के झाले ।
भित्यापाठी ब्रह्मव्हायरस
हे सूत्र येथे जमून गेले
विकून आशा धन मोजता
नफेखोरही दमून गेले ।
खरेच लस का येईल कधी
की ते ही होते कांगावे
करण्या सारवासारव तो ही
डंका होता? सांगावे ।
मला वाटते नव्हेच व्हायरस
नव्हेच कसली महामारी
मुठीत राखण्या जगरहाटी
कुणी बळे लादली लाचारी ।
कवी :-
अरविंद परुळेकर, विरार
Comments
Post a Comment
Did you like this blog