◼️ कविता :- किल्ली
किल्ली / चावी
🌸💐🌸
कधी ओळखशील स्वतःला अरे भल्या माणसा
देवाजीने किल्ली देऊन पाठविला बाहुला जसा
नाही दिसत ती तरी तोच सर्व घडवितो
त्या हुकूम जगती या तू पळतो नि थांबतो
पाप पुण्य दुःख दैन्य जरी तुजला कळते
पाहून ते मन बघ रे तुझे कधी ना ढळते
राग लोभ मोह द्वेष असेल जरी अंतरी
तुला ना कळते कधी गोष्ट कोणती बरी
मन बुध्दीची चावी त्या परमेशा हाती
त्यानुसार जगावे लागते या जगती
प्रार्थना करून सांग झणी तू त्या देवाला
जरी चावी हाती तुझ्या कल्याण करी प्रतिपाळा
चावीने तुझ्या विश्वातील अशुभ सारे घालवावे
सत्य शिव नि सुंदराचे नित्य अधिराज्य असावे
...
केशीराज
शरदकुमार सुमन -ज्ञानेश्वर वेदपाठक
[ मंद्रुपकर ]
सोलापूर
_______________________________
अप्रतिम समर्पक शब्द रचना.
ReplyDeleteनक्कीच सर 🙏🙏🙏
Delete