◼️ बोधकथा :- एकीचे बळ मिळते फळ
एका जंगलाभध्ये बरेच प्राणी, पक्षी रहात होते.. त्यात वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, रानगवे, हरिणे, माकडे हे सर्व आपापल्या कळपा बरोबर.. थव्यां बरोबर आनंदाने रहात होते. त्या जंगलात एक तळे होते. त्या तळ्यावर सर्व प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत.
एकदा काय झाले, रानगव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी तळ्यावर आला. त्यात तरुण, म्हातारे रानगवे होते. तसेच त्यांची छोटी छोटी बछडीही होती. सर्वांनी आनंदाने पोटभर पाणी प्यायले. पाणी पिऊन तो कळप परत जायला लागला.. तेंव्हा दबा धरून 2-3 वाघ शिकार करण्या- साठी बसलेले त्यांनी पाहिले.. त्या बरोबर सर्व रानगवे धावू लागले.. बछडीही धावू लागली..पण त्यात एक छोटे बछडे होते. त्याला काही जोरात धावता येईना..ते तळ्याच्या काठाने पळत असल्याने त्याचा पाय घसरला व ते पाण्यात पडले. झालं!! वाघांना वाटलं चला आपल्याला आता आयतीच शिकार मिळालीये.. पण त्या बछड्याचा आवाज ऐकून ते रानगवे थांबले.. त्यांनी पाहिले की.. बछड्याला आता ते वाघ मारणार.. म्हणून ते जोरात परत मागे फिरले व वाघांवर धावून गेले.. सर्वांनी मिळून वाघांवर हल्ला चढवला. त्यामुळे घाबरून वाघही पळून गेले.. नंतर त्या रानगव्यांनी बछड्याला पाण्यातून बाहेर काढले व सर्व आनंदाने चालू लागले.. त्या रानगव्यांनी एकी दाखवल्यामुळेच त्यांचे बछड्याचे प्राण वाचले.
तात्पर्य -- एकीचे बळ मिळते फळ
सर्वानी एकी ठेवली तर कठीण प्रसंगातून सुध्दा सहीसलामत बाहेर पडता येते..
.........
मृणाल प्रभुणे
नाशिक.
Comments
Post a Comment
Did you like this blog