◼️ बोधकथा :- काळ आला पण वेळ आली नाही.

 

कथा :- रामू नावाचा शेतकरी अतिशय गरीब होता. तो आपल्या शेतात माल पिकवून  आपलं आणि कुटुंबाचं उदरभरण करायचा.

तो दररोज शेतात जायचा, आणि सायंकाळी घराकडे यायचा. अशी ही रामूची क्रिया दररोज असायची, नेहमीप्रमाणे रामू सकाळी शेताकडे गेला शेतात जाऊन रामूने गुरांना चारा पाणी केले; आणि आपल्या कामात गुंतला पाहता पाहता दुपार झाली सूर्य डोक्यावर आला, ऊन खूप तीव्र होते; आणि रामूला भूकही लागली होती. तेव्हा राम सावलीच्या दिशेने झाडाकडे निघाला .

तेवढ्यात एक वाघ ही सावलीच्या दिशेने झाडाकडे निघाला वाघाला पाहून रामू दचकला आता रामू ला पुढे जाता येत नव्हते; म्हणून रामू मागच्या दिशेने निघाला.

तेवढ्यात वाघाची नजर रामु वर पडली आता मात्र पुढे रामु  पळू  लागला आणि मागे वाघ पळत पळत रामू एका विहिरीवर जाऊन थांबला.

रामूने विचार केला विहिरीत उडी मारून जीव वाचवू, आणि वाघा पासून सुटका सोडवू तेवढ्यात रामूने विहिरीत न पाहता उडी मारली पण; दैवाचा घात विहिरीत मात्र पाण्याचा एकही थेंब नव्हता,

आता रामू खूप घाबरला रामू ला मुक्काम मारही लागला , डोके फुटले, रक्तबंबाळ झाला .

तब्बल दोन तास रामू विहिरीत राहिला त्यानंतर तो वर येऊन घरी परतला, हा सगळा वृत्तांत कुटुंबाला सांगितला.


तात्पर्य:- कोरड्या विहिरीत उडी मारून सुद्धा, आणि वाघा पासून सुद्धा. राम वर मात्र,

(काळ आला होता पण वेळ आली नव्हती......)

लेखक :- मोरे अनिकेत कैलास.

        

           

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !