◼️ ललित लेख :- सरपंच कसा असावा ?


 सरपंच कसा असावा ?

________________________________

रपंच, एक गावाचा नायक. सरपंच एक गावातील राजा असतो, गावातील विकासक असतो, गावातील पहिला व्यक्ती असतो, तो गावची शान असतो, तो गावातला  पहिला जनसेवक असतो,

मित्रांनो सरपंच असाच निवडा जो गावाची सेवा करेल, असा नाही की जो स्वतःचा मेवा करेल .

सरपंच कोणाला पण करा पण हे एकदा वाचा

👇👇👇

   लक्ष्य ग्रामपंचायत             

 सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्या,सदस्य,पँनल प्रमुख कसा असावा,कसा नसावा.

✅ गावामधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजनारा नसावा जर गावात भांडणे झाली तर ती मिटवणारा असावा नाही की वाढवणारा नसावा.    

✅ गावचा होणारा सरपंच सदस्य हा गावात रहाणारा असावा,जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा.

 ✅ जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना शासन कडून दोन टँकर असताना गावात एकच टँकर कधी तरी टाकणारा वरून उपकाराची भाषा करणारा नसावा कारण ते त्याचे कर्तव्य आहे.

 ✅ गावाच्या विकासासाठी आलेला 14 वा वित्त आयोग निधी सर्व मिळून म्हणजे सरपंच,ग्रामसेवक,आणि स्वयंघोषित लोकल नेते,आदी जन वाटून खाणारे नसावे पुन्हा गाववाल्यांना माहीत झाल्यावर आम्ही पैसे देतो म्हणून पुन्हा पैसे बुडावणारे लबाड नसावा.

✅शासनाचे स्कीम लाभार्थींना फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारे नसावा उदा,घरकुलासाठी पाच दहा हजार रुपये घेऊन पार्टी करणारा नसावा.

 ✅ MRGS मधून  मिळालेल्या विहिरीच्या लाभार्थीकडून दहा पंधरा हजार घेणारा नसावा. 

✅ दारिद्रय रेषेत नाव घालण्यासाठी दोन हजार रुपये घेणारा नसावा.

✅ग्रामपंचायत सदस्य सदस्या आपल्या वार्ड तील समस्याची जाणीव असणारा असावा आणि पोटतिडकीने कामे करणारा असावा.  

✅ गावातील गरीबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत करणारा असावा. 

✅लोकांना खोटी आश्वासने देऊन लोकांना नोकरी लावतो.अडचणीच्या काळात पैसे देऊन व्याज उकळणारा आदी मार्गाने लुबाडणूक करून लोकांची दिशाभूल करणारा नसावा.   

✅गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनेची काम अर्धवट करून पूर्ण बिल उचलणारा आणि शाळेतील मुख्याध्यापला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा.

✅सर्वात महत्वाचे म्हणजे गावासमोर आमचे भांडण आहे असे  दाखवून गावासाठी आलेले पैसे वाटून खाणारा नसावा.

✅ गावातील सर्व पदे आपल्याच घरात ठेवणारा तर नकोच उदा भावाला एक पद,बायकोला एक पद,चुलत भावाला एक पद,स्वतःला अनेक पदे,आणि सब माल अंदर सगळं मलाच पहिजे अशी भावना असणारा नसावा.

✅गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा.

✅सरपंच आणि प्रशासन एखादा सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर त्याच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा असावा.

✅ ग्रामपंचायत सदस्य हा गावातील  वॉर्डातील घनकचरा, गटारी ,रस्ते पाणपुरवठा यांचे नियोजन करून स्वच्छ ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा. ना दारू पिऊन धाब्यावर बसवून गावच्या विकासच्या चर्चा करणारा.

✅कायम वर वर गोड गोड गप्पा

मारून हात हलुन फसवनारा तर अजिबात नसावा.

✅जवळच्या व्यक्तीची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा.

✅सरपंच झाल्यावर फक्त आपल्याच पँनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पँनलच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा.

✅सरपंच झाल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारा असावा.

✅पँनल प्रमुख गावात राहणारा असावा गावातील कोणत्याही संस्थाच्या निवडणूका आल्यावर गावात येणार नसावा आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकांच्या पाय पडणारा नसावा.

✅ग्रामस्थांनो👬जर का वरील गुण तुमच्या *सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सदस्या,पँनल प्रमुख* यांच्यात दिसले नाहीत तर तुमच्या गावाच्या विकासाला खिळ बसलीच समजा.

________________    __  _________________

निवडणुकीतील तमाम कार्यकर्त्यांना खालील कविता समर्पित

मिरवू नकोस टेंभा 


मिरवू नकोस टेंभा,

बडवू नकोस ढोल.

स्वार्थी ढोंगी नेत्या मागे,

उगा फिरु नको गोल...धृ


बंद कर तुझा डाम डौल,

कार्यकर्ता बनून फिरन.

काम पडेल तेव्हा हजर,

नेत्यासाठी रात दिस झूरण...१


पदासाठी यांचे मुलं पुढती,

आपले पत्ते हेचं खोडती.

नको तेव्हा बाजूलाही काढती,

काम होता वाऱ्यावर सोडती...२


बघ काही कामधंदा,

घर चालवाय होईल सोपं.

चार माणसं चांगलं म्हणतील,

तुझे काढणार नाहीत मापं...३


उगीच नेत्या मागे फिरता,

वेळ असाच जाईल वाया.

मुलं बाळं राहतील उपाशी,

त्यांना काय घालशील खाया...४


काम धंदा करशील तेव्हा,

चार पैसे येतील हाती.

दूर होईल उपासमारी,

घर उजळेल, दिवा बत्ती...५


चार चौघात वाढेल इमेज,

घराला येईल घरपण.

घर भरुन जाता सुखानं,

दिसेल स्वच्छ सुंदर दर्पण...६


   ✍️ खंदारे सुर्यभान गुणाजी

     मु.पो.जलधारा ता.किनवट

       संवाद- 9673804554


Comments

Post a Comment

Did you like this blog

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !