◼️ बोधकथा :- देवाने दिले कर्माने नेले
एका गावात एक अत्यंत गरीब माणूस राहत होता अत्यंत हालाखीची परिस्थितीत जीवन जगत होता, एकदा भगवान शंकर आणि पार्वती माता आकाशमार्गे जात असताना पार्वती मातेस, त्या गरीब माणसांची दया आली, पार्वती माता भगवान शंकरानां म्हणाली , ह्या गरीब माणसाला काहीतरी मदत करा भगवान शंकर म्हणाले याच्या नशिबात नाही ते पार्वती माता नाराज झाली. शंकराने तिला समजूत काढण्यासाठी व्यक्तीची मदत करण्याचे ठरवले .देवाने काही अंतरावर सोन्याने भरलेल्या मोहराचा हंडा ठेवला.गरीब माणूस पुढे चालत होता ,त्याला रस्त्याने जात असताना एक आंधळा व्यक्ती जात असताना दिसला, गरीब माणसाला वाटले की आपणही डोळे मिटून त्याच्यासारखे चालून बघावे, तो चालू लागला त्यांच्यापुढे काही अतंरावर शंकराने सोन्याची भरलेल्या मोहराचा हंडा ठेवला होता, तो त्यास ठेचकाळत डोळे झाकून तो पुढे निघून गेला . ...............
तात्पर्य :- वेळ काळ कोणाचा कसा येईल सांगता येत नाही , आपण आपल्या कर्मानुसार कार्य करावे, दुसऱ्याचे अनुकरण कार्य करु नये............................
भिमदादा काळे.. तुळजापूर
Nice story
ReplyDelete