Posts

Showing posts from December, 2020

◼️ कविता :- नाताळ ... | ✍️ मराठीचे शिलेदार कविता समुह

Image
🤶 सर्वप्रथम मराठीचे शिलेदार समूहातर्फे तुम्हाला मेरी क्रिसमस   🤶 ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ ‼ 'मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼ ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾        🙏विषय :- नाताळ🙏        🎋दिनांक:-२५ डिसेंबर २०२० 🎋 🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲 आनंदी आनंद झाला उत्सव  येशूजन्माचा  चहूकडे रोशनाई दिसे सण आला नाताळाचा गायींचा गोठा सजला मेरीचा चेहरा खुलला येशू बाळाच्या जन्माने सारा आसमंत उजळला शांतीचा महानायक  दया ,करूणेचा सागर  क्षमा शिलतेचा दाता प्रेमाचा तो पाझर पापमुक्त करण्या जगाला जन्म घेतला भूतलावर शत्रूवर ही प्रीती करून जगी झाला अजरामर शिकवण दिधली मानवा वैऱ्यावरही प्रेम कर क्षमा करून प्रत्येकाला सर्वांसाठी प्रार्थना कर सौ.संगिता बनसोड मुनेश्वर  यवतमाळ ©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह 🌲🎄🤶🎄🎅🎄🎁🎄🌲 हिरवे हिरवे झाड  त्याला करू मोठं वाट पाहू त्या दिसाची आनंदाचं लोठ हिरवे हिरवे झाड त्याची मोठी सावली सांताक्लॉज होऊनि प्रेम देई परी मावली आला महिना डिसेंबर सामान घेऊ नवे नवे नाताळ

◼️ कविता :- दुरावा ... | ✍️ मराठीचे शिलेदार कविता समुह .... | Marathi Poem

Image
➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖ मराठीचे शिलेदार कविता समुह ➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖ ‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'काव्य लेखन'.‼ ➖➖➖➖🍂〰🍂➖➖➖➖        🙏विषय :- दुरावा 🙏        🍃 दिनांक:-  २१ / १२ /२०२० 🍃 💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌 येणार ना कधी नात्यात दुरावा असाच प्रत्येकाने मनी विचार ठेवावा स्वार्थामुळेच येई नात्यात दुरावा निस्वार्थ गुण स्वत: अंगिकारावा नकोच हेवे दावे वाढती दुरावे नकोच उने दूने सारे समजुन घ्यावे जपता नाते स्नेहाचे बदलेल सारे क्षणात सुख समृद्धी नांदेल आपल्या जीवनात. अनमोल क्षणांचा आनंद जीवनी घ्यावा देऊन मान साऱ्यांना  आशिर्वाद मिळवावा *चव्हाण बी.एम.सेलु.परभणी* *© सदस्य मराठीचे शिलेदार समुह* 💌.....💌.....💌.....💌.....💌.....💌 प्रेमासाठी प्रिये तू किती केला अट्टाहास आता तू असा माझा करू नको ग उपहास प्रेमविवाह करण्यासाठी चाललो आपण खडतर वाट पवित्र आपुल्या नात्याचा तू करू नको ग नायनाट सुखी आपुल्या संसारात कमी जास्त झालं ग काही तुझ्यावरचं प्रेम मात्र अजिबात कमी झाल नाही तुझ्यापासून वेगळं राहणे सहन होईना हा दुरावा राग

◼️ यशाचा मंत्र :- निराशेला नाहीशी करणारी ऊर्जेची चौदा सुत्रे..

 कृपया नक्की वाचा व अमलात आणण्याच्या प्रयत्न करा...... निराशेला नाहीशी करणारी ऊर्जेची चौदा सुत्रे... --------------------------------------------- १) सतत सकारात्मक राहा कितीही वाईट घडो, नेहमी सकारात्मकच रहायचं! प्रत्येक अपयश आपल्याला एक संधी देऊन जात असते. २) ध्येयाच्या प्रेमात पडा. आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.  आपणही आपल्या ध्येयासाठी वेडं बनलो तर!…. ३) महिन्याला दोन पुस्तके माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढावीत. ४) डायरी लिहा:- दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते. ५) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा.हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं! ‘सोप आहे, हे करू शकतो’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा! ६) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा. ७) कमीत कमी तीस मिनीट मनाचा आणि शरीराचा व्यायाम.  जगातल्या

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

Image
   काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली : चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला.        या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्‍याने आपल्या भिकारीच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (व्यवसाय हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता.  किती छान वाटलं असतं त्याला भिकारीपणातून बाहेर येऊन. अनेक नवोदित भिकार्‍यांना तो भीकही देऊ शकला असता.        पण नाही. ते त्याला जमलं नाही. याचं कारण असुरक्षितता, सवय आणि भीती. आपण जमवलेले पैसे नक्की किती, हेच त्याला स्वत:ला माहीत नसावं. आपण भीक मागणं बंद केलं तर आपण जमवलेले पैसे आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नक्की पुरतील की नाही याची भीती त्याच्या मनात असावी. समजा जमवलेले पैसे खर्च करून आपण चैन करायला लागलो आणि हौस मौज करता करता आपले पैसे संपले

◼️ ललित लेख :- मी देव पहिला.... | Maze laksha

खरोखरच अंतकरणा पासुन वाचाल तर डोळ्यात पाणी येणारच!          एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईट च्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा मुलगा अभ्यास करताना पहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण मग्न होता वाचनात.                  हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खुप जिज्ञासा होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ.                       रात्रीचे साडेबारा वाजले असतील. मी त्या मंदिरा कडे आलो. तर तो मुलगा नेहमी प्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला. मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात  हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस?  सर माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास  करायला. माझी ऐपत नाही. बाळ तू मला बघून गोड हसलास का?  सर तुम्ही देव आहात का?  नाही रे!  सर तुम्ही माझ्या साठी देवच आहात. 

◼️ कविता :- विवंचना... | ✍️ मराठीचे शिलेदार कविता समुह.... | Prayerna

कविता समूह क्र ५,६ व ७ चे संकलन     📚'मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ 📚 ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ ‼ 'मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले ' कविता लेखन'.‼ ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖         🙏 विषय :- विवंचना🙏         🎋 दिनांक :-  १८ डिसेंबर २०२० 🎋 ✳️💠🔳🌀🔳💠✳️ आरं पावसा पावसा कधी वागशील नीटं तुझ्या लहरी पणाचा किती आणशील वीटं... // कधी होवूनी आतूरं पाहे  येण्याची  वाटं ओला मुक्काम इतुका  कधी डोळ्यातून पाटं... // कधी उरात धडकी  पडे घशाला कोरडं कधी ओसरं ओसरं चाले पुरातं ओरडं... // कधी ओसाडं रानातं नाचे आनंदून मोरं कधी सुसाटं मोकाटं जसं पिसाळलं ढोरं... // कधी शिवारी सजते उभ्या पिकाची आरासं.  कधी जिव्हारी झोंबतो तुझा अवकाळी तरासं... // विवंचना ही अशीचं बळीराजाच्या वाट्याला  जगे जगाचा पोशिंदा  चिमटा देऊन पोटाला.. // विष्णू संकपाळ औरंगाबाद ©सदस्य मराठीचे शिलेदार समूह ✳️💠🔳🌀🔳💠✳️ शुभ्रांकित  वस्त्र  ल्यालेले भोवताली पसारे धुक्यांचे ओघळता दव जाणिवांचे मोहरले  पान काळजाचे शहारलेल्या   गालावरती