◼️ यशाचा मंत्र :- निराशेला नाहीशी करणारी ऊर्जेची चौदा सुत्रे..

 कृपया नक्की वाचा व अमलात आणण्याच्या प्रयत्न करा......

निराशेला नाहीशी करणारी ऊर्जेची चौदा सुत्रे...

---------------------------------------------

१) सतत सकारात्मक राहा

कितीही वाईट घडो, नेहमी सकारात्मकच रहायचं!

प्रत्येक अपयश आपल्याला एक संधी देऊन जात असते.

२) ध्येयाच्या प्रेमात पडा. आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

 आपणही आपल्या ध्येयासाठी वेडं बनलो तर!….

३) महिन्याला दोन पुस्तके

माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं,

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढावीत.

४) डायरी लिहा:- दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

५) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा.हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

‘सोप आहे, हे करू शकतो’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

६) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा.

७) कमीत कमी तीस मिनीट मनाचा आणि शरीराचा व्यायाम. 

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्ती हे सुत्र अमलातआणतात.

८)ध्यान, निर्णय क्षमता,सर्व समस्यांवर उपाय

तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीच!

९) महिन्याला एक वाईट सवय सोडा.

महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

१०) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

११)जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.

जो कृतज्ञ आहे, त्यालाच नियती अजुन जास्त भरभरुन देतं, हेच शाश्वत आहे.

१२) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा .यश हे उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

१३) सुरक्षित अंतर ठेवा,

निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

१४) तीस दिवसांचा प्लान

पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा ठोकताळा महिन्याच्या सुरुवातीला तयार करवा.


एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने मनात कोराव.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...