◼️ कविता :- विवंचना... | ✍️ मराठीचे शिलेदार कविता समुह.... | Prayerna
कविता समूह क्र ५,६ व ७ चे संकलन
📚'मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ📚
➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖
‼ 'मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼
➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖
🙏विषय :- विवंचना🙏
🎋दिनांक :- १८ डिसेंबर २०२० 🎋
✳️💠🔳🌀🔳💠✳️
आरं पावसा पावसा
कधी वागशील नीटं
तुझ्या लहरी पणाचा
किती आणशील वीटं... //
कधी होवूनी आतूरं
पाहे येण्याची वाटं
ओला मुक्काम इतुका
कधी डोळ्यातून पाटं... //
कधी उरात धडकी
पडे घशाला कोरडं
कधी ओसरं ओसरं
चाले पुरातं ओरडं... //
कधी ओसाडं रानातं
नाचे आनंदून मोरं
कधी सुसाटं मोकाटं
जसं पिसाळलं ढोरं... //
कधी शिवारी सजते
उभ्या पिकाची आरासं.
कधी जिव्हारी झोंबतो
तुझा अवकाळी तरासं... //
विवंचना ही अशीचं
बळीराजाच्या वाट्याला
जगे जगाचा पोशिंदा
चिमटा देऊन पोटाला.. //
विष्णू संकपाळ औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
शुभ्रांकित वस्त्र ल्यालेले
भोवताली पसारे धुक्यांचे
ओघळता दव जाणिवांचे
मोहरले पान काळजाचे
शहारलेल्या गालावरती
निखळला थेंब आनंदाचा
गुणगुणला ओठांवरती
हर्षोन्मिलीत क्षण प्रेमाचा
थबकलेल्या पावलांनाही
गवसला सूर उडण्याचा
हिरमुसल्या स्वप्न पंखाना
ध्यास अनंत क्षितिजाचा
निद्रिस्त भाव कळ्यांनाही
प्रसन्नतेने आली ही जाग
अंतरी नैराश्य तिमिराचा
न उरलाय कुठलाच भाग
सरल्या अवघ्या विवंचना
झाली सुगंधित पायवाट
सुखद वाटतो आयुष्याचा
हा नागमोडी वळण घाट
बाहू पसरूनी जगण्याला
मी स्विकारेन जखमांना
समन्वयाच्या हिंदोळ्यावर
झुलवेन या सुख दुःखांना
मीता नानवटकर नागपूर
सदस्या मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
विवंचनेत धावते अजूनी
काळ अजूनी सापडत नाही
बाईमाणुस देह माझा असा हा
दिवसा ढवळ्या डोळ्यात सळत राही...!!१!!
नजर हीनतेची पाहते मजकडे
नव-याने टाकलेली आहे अजूनी
काय प्रतिमा देवीची उपयोग सांगा
घरोघरी टांगून देवा-ह्यात पुजूनी....!!२!!
विवंचना सदाची बाप भाऊ असो नव-याच्या दारी
कधी पुजेल जग हृदयात बसवून
पहता गरीब बिचारी बहिण बाई
दया नाही हक्क देतील ना काही मागून....!!३!!
येणार नाही पाळी कोणाच्या नशीबी
विवंचनेत सदाच राहण्याची तिची आता तरी
करावी आराधना मनापासून सर्वांनी
भाषा वापरली आपुलकीची जरी....!!४!!
©️✍️...
मा.kvकल्याण राऊतसर
मराठवाडाप्रदेश लातूर
©️मराठीचे शिलेदार समुह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
आज मृत्यूशय्येवर असता
">कोणतीच विवंचना नाही उरली,
सारे सर्वोच्च सन्मान काव्यक्षेत्रातले
प्राप्त झाले,ज्यांची आस धरली!
एक-एक सन्मानपत्रावरुन
फिरतेय आज भिरभिरती नजर,
होईल कोणत्याही क्षणी आता,
मृत्यूरुपी सायरनचा गजर!
एक-एक रचना आठवते
रचताना झालेली घालमेल स्मरते,
त्या रचनांतील हस्तलिखित अक्षरे
अंतीम यात्रेची वाट अडवून धरते!
आमच्याही घरी आहे शब्दधन
जे जीवंत अनुभवांचे असती बोल,
प्रपंचही करुनी नेटका,सुखाचा
जगलो जीवन,जे होते अनमोल!
आता निरोपाची झाली वेळ,
काव्यगंगा आमची थांबणार आता,
चुक-भूल देऊन-घेऊन
स्विकारावा प्रणाम जाता-जाता..!
स्विकारावा प्रणाम जाता-जाता!!!
श्री.मंगेश पैंजने सर,
ता.मानवत,जिल्हा-परभणी,
© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.
✳️💠🔳🌀🔳💠✳️
आजकाल जीव माझा
लागत नाही कशात
मन माझे अडकून पडते
नको त्या विचारात
अशा वेळी दुरावलेले
वाटतात आहेत आसपास
घरदार सारे दिसत उदास
जणू बाग बगीचा पण वाटतो उदास
उगाच वाटते आयुष्य सारे
थोड्या दिवसाचे झाले
कसे गेले कळले नाही
हाती फार थोडेच राहिले
चार दिवस काळजीत
चार दिवस वाट पाहण्यात गेले
थोडे दिवस प्रयत्नात तर
बाकी सारे विवंचनेत गेले
इच्छा गेली मरून नि
श्वास थकून गेला वाटतो
डोळ्यातील अश्रू देखील
आतल्या आत मेल्यासारखा वाटतो
हिंमतीने आयुष्य सावरताना
कुणाला सांगायची व्यथा
प्रत्येक जण धडपडत असतो लपवायला आपली व्यथा
मिलन डोरले/ मोहीरे पुणे
@सदस्या मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
सोडून घरट्यात पिलांना
पक्षीनी वनात जाई
गुंतला जीव सारा
आठवण पिलांचीच येई
पिल्लांच्या आवाजाचा
मनात भास होई
बेचैन दाने टिपताना
व्याकुळ मात्र आई
चिवचिवाट ऐकू येता
कासाविस जीव होई
घास भरविण्या पिलांना
हळुच घरट्यात येई
हे पाहुन सारे मनात
पशुपक्षांची विवंचना वाटे
पहाता पिलांना आई
हळुच बिलगून भेटे.
चव्हाण बी.एम.सेलु.परभणी
© सदस्य मराठीचे शिलेदार समुह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
बळीराजाची ही विवंचना
कळेल का हो कुणाला ?
उपासमारी अन् कर्जाने
बळीराजा हवालदिल झाला
भेगाळल्या काळ्या भुईत
दिसेना हिरवं हिरवं रान
ना मिळे मोबदला पिकाला
शिवारी अहोरात्र राबराबुन
राबणारा जगाचा पोशिंदा
मनाने मात्र खचून गेला
दुष्काळाने अन् गरिबीने
आत्महत्या करू लागला
लोकशाहीच्या देशात
ध्यास विकासाचा लागला
सावरकर दलालाच्या राज्यात
बळीराजाचा दर्जा खालावला
म्हणूनी रक्त आटलेल्या घामाची
कदर आपण सारे करूया
अन् जय जवान जय किसान
या शब्दाची किंमत जाणुया..
सौ सुनीता लकीर आंबेकर
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
ईच्छा अपेक्षांच्या अतृप्त सागरात
असतो आपण सारेच तरंगत
कितीही प्यायला पाणी ईच्छेनुरुप
तरी तृप्ती ना मिळे जिवनात
कधी प्रश्न दाटे अंतःहृदयी
का आलोत जन्माला जगात
मना सारख घडत ना कधीही
स्वारस्य वाटे फक्त मरण्यात
विवंचना सदा ठाई भरली
सार काही आपल करण्यात
अरे मनुष्या जाणुन घे सत्य
खाली हात आलो येतांना...
जातांनाही नसणार काही हातात
किती करशी माझ माझ डोई ओझ
कोणी ना येणार सोबत मरणोपश्चात
भविष्याची विवंचना सोडून जग निश्चिंत
प्रश्नांची उत्तरे असतील तुझ्या पुढ्यात
सौ रुपाली म्हस्के मलोडे गडचिरोली
सदस्या मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
प्रश्नही तुझेच रे
उत्तरेही तुझीच
फक्त वेळेनुसार
कधी सोपी तर
कधी कठीण...
सोडवत राहतो
आम्ही आजन्म
विवंचना वाटते
का बरे, कसे बरे ?
पण ती असते
फक्त उकलक्रिया
बाकी तर ठरवणे
हे तुझ्याच हाती
कधी आनंदाश्रू
तर कधी दुःखाश्रू
कळतच नाही कोडे
पण सुख आणि दुःख
हेच गमक जीवनाचे
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
कोणी आणि कशाला
शोध लावला दारूचा
व्यसनाधिनतेने आनंद
हिरावला परिवाराचा....!!१!!
">बायको दिनभर कष्टते
पोटाच्या खळगीसाठी
विवंचना मनी सतावते
दोन घास सुखासाठी...!!२!!
लेकरांच्या भविष्यासाठी
नारी करते रक्ताचे पाणी
दमडी दमडी साठवलेली
दारुड्या लावतो कारणी...!!३!!
झुलत झुलत बेरात्री
शिव्या मारझोड सुरू
छळ सहन करताना
श्वास लागतो रे मरू...!!४!!
मरत मरत धडपड
केविलवाणी तिची
आयुष्य आलं संपत
विवंचना लेकरांची...!!५!!
✍️सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड
कवयित्री/लेखिका/सदस्या
मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
आनंद लयास. जगणे उदास
जाळते चित्तास विवंचना.. //
कुणा चाकरीची कुणा भाकरीची
कुणा आजाराची विवंचना... //
कुणा माथी ऋण कित्येक कृपण
संकटे दारूण नाना रूपी... //
मोहाच्या कारणे चुकती धोरणे
यशाची तोरणे दुरावती... //
जगाची भ्रमंती अपार श्रीमंती
परी मनःशांती हरवली... //
चोर शीरजोर साव कमजोर
लागे जीवा घोर दिनरात.. //
नव्हे मरणाची भिती जगण्याची
गती जीवनाची. ऐसी झाली.. //
होण्या चित्त शुद्ध घ्यावा आत्मशोध
गुरू मुखी बोध विष्णू म्हणे... //
विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
विवंचना दहशतवाद्यांची
भिडली साऱ्या मना
पहारा देण्यास सक्त
अमुचे नौजवान.......
दरीनदराची आहे नजर
भूमातेच्या मुकुटावर
लहरती तिरंगा अमुचा
सळसळत्या रक्तावर
होतो हल्ला पुलवामा, कश्मीर
दाहशतवाद्यांनो कान देऊनी
ऐका.........
नौजवानाचा सुटला तीर
करून टाकतील चिरोचिर
विवंचना होई मनी
दहशतवादी हल्ल्याची
रक्षणकर्ता अमुचा नौजवान
देशसीमेवर लढण्याची
मनीषा ब्राम्हणकर
अर्जुनी/मोरगाव, गोंदिया
मराठीचे शिलेदार समूह सदस्या
✳️💠🔳🌀🔳💠✳️
सोसतो मी आयुष्यभर
पाऊस ऊन अन वारा
कधी ओला दुष्काळ
तर कधी तापते धरा
मीही आहे माणूस नि ऐका
माझीही विवंचना व व्यथा
मलाही मांडू वाटते
जीवनाची माझ्या गाथा
तुडवतो मी चिखल
रुते पायात काटा
आता तरी द्या मला
माझ्या कष्टाचा वाटा
मी पाळतो परंपरा
हाती घेऊन नांगर
साला मागून जातील साल
नशीब माझे कधी बदलणार
कर्जा पाई मी मोडलो
झालो मड जीवंत असून
करून कष्ट मी उपाशी
जगतो उधार जीवन
शेतकरी राजा आता
जाब तुम्हा विचारी
मांडून दुःख विवंचना
येऊन दिल्ली दरबारी
©️सौ संगीता म्हस्के पुणे
सदस्य मराठीचे शिलेदार समूह
✳️💠🔳🌀🔳💠✳️
🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏
✏सौ.कल्पना शाह
डोंबिवली,जि.ठाणे
©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह
➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖
Comments
Post a Comment
Did you like this blog