◼️ कविता :- गेली लयाला संस्कृती... | Prayerna
पाश्चिमात्य रित आली
गेली लयाला संस्कृती ।
आता फक्त दिसे डोळा
साऱ्या दिशेने विकृती ।।
वाऱ्यासम पसरली
ईंग्रजीची कार्यशाळा ।
श्वेत फळ्यामुळे आज
फळा नष्ट झाला काळा ।।
मराठीची वर्णाक्षरे
ज्ञात नाहीत मुलांना ।
जन्म झाला इथे तरी
पूजतात ईंग्रजांना ।।
आई गेली,बाबा गेले
आता नवे नाते आले ।
हुशारीच्या नादामुळे
लोकं इथे वेडे झाले ।।
जुनी प्रथा पुस्तकात
आता सारेच विचित्र ।
छेडखाणी करणारे
सारे झालेत पवित्र ।।
अरे वाचवा देशाला
कला ठेवून जिवंत ।
परभाषा स्वीकारून
होणे आपलाच अंत ।।
देऊ त्यांनाही सन्मान
आधी जपू मराठीला ।
टिळा लावूनी ललाटी
पुजू चला धरतीला ।।
©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,तरनोळी
ता.दारव्हा,जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
Comments
Post a Comment
Did you like this blog