Posts

Showing posts from April, 2021

◾कविता :- मीच माझा रक्षक

Image
कोरोना संसर्गातून बचावासाठी , अंगिकारले होते मंत्र ।  मीच माझा रक्षक होईन ,  हेच सरकारने दिले तंत्र ॥  हाच महत्त्वाचा संदेश ,  महाराष्ट्रात सर्वानी पाळावा ।  स्वयं शिस्तीने एकमेकांपासून ,  अंतर सर्वानी ठेवावा ॥  संपूर्ण जगात घातला आहे ,  असा धुमाकूळ कोरोनाने ।  त्याला लगाम लावण्यासाठी ,  रक्षक बनावे या मंत्राने ॥  जीवनात आले कितीही संकट ,  आपल्यालाच बनावे लागते रक्षक ।  आयुष्य जगण्याला मदत होते ,  नाहीतर इथे अनेक आहेत भक्षक ।।  करुया आपण जनजागृती ,  "मीच माझा रक्षक" होईन ।  स्वस्थ राहा , स्वस्थ राहू दया ,  या मंत्राचा वारसा घेईन ॥  ======================== महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "  गोंदिया =======================

◾कविता :- भगवान महावीरांचे जीवन

Image
भगवान महावीरांचे जीवन, सर्वासाठी प्रेरणादायक आहे ।  राजमहालात राहून सुध्दा,  राजसुखाचा त्याग केला आहे ॥  अहिसेंचे मूर्तिमंत प्रतिक, चोवीसवे तीर्थकर महावीर झाले ।  आई त्रिशाला वडिल सिध्दार्थ, यांचे बालपण राजेशाही थाटात गेले ॥  वयाच्या आठव्या वर्षापासून, शिक्षण व शस्त्रविद्येचे घेऊन धडे ।  श्वेतांबर पंथाच्या नियमाप्रमाणे,  यशोदा यांच्याशी लग्न घडे ॥  संपूर्ण आयुष्य मानव जातीला ,  सत्य आणि अहिसेंचा मार्ग दाखविला ।  आपसात एकजुटीने राहण्यास शिकवून ,  पशुहत्येचा कडाडून विरोध केला ॥  महावीरांनी खूप परीश्रम घेऊन ,  त्यांना ज्ञान प्राप्त झाला ।  जनकल्याणासाठी उपदेश देऊन ,  जैन धर्माचा प्रसार प्रचार केला ॥  ***************************** महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन " गोंदिया दिनांक : २५/०४/२०२१ -----------------------

◾कविता :- श्रीराम वाणी....

Image
श्रीरामाच्या नावात आहे ,  एक वचन एक वाणी ।  कर्तव्याचे पालन करुनी ,  त्यांचे कार्य ऐकती कानी ॥  घेता रोज रामनाम अति सुंदर ,  जीवन असे आनंदी रे ।  राम नाम घेता पळती दुःख हे ,  राममंत्र हा सतत जपारे । । कर्ता तोच करविता प्रभू ,  भक्तीचा भूकेला आहे राम ।  नामाची संगत ऐकत कोणी ,  सर्वाच्या हृदयात आत्माराम ||  नको प्रपंचाची आसक्ती ,  तोषोनी मन घेते नाम ।  तुझ्या चरणाची रज माथी ,  लावीन मी सदैव श्रीराम ||  चराचरात हा वसते राम ,  आशिष दे मज होई काम ।  श्वास आणि ध्यास तुझारे ,  शेवटी मुखी असो श्रीराम ॥  ======================= महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन " गोंदिया  दिनांक - 21/04/2021 =======================

◾कविता :- आईच्या हाताची भाकरी...

Image
पेटत्या चुलीजवळ बसून ,  भाकरी गरम तव्यावरची ।  त्यात असे आईची माया ,  आग शांत होई खाणाऱ्याची ॥...1 आई भाकरीच्या पीठाला ,  मन लावून मळायची ।  तेव्हाच तर तव्यावर ती ,  आईच्या प्रेमाने फुलायची ॥...2 भाकरी बनवितांना आई ,  जुन्या गितांना सुरात गायची ।  त्यात तिच्या दुःखाची आवाज ,  मला सहज समजून जायची ॥...3 उपाशी लेकराला आई ,  उठवून भाकर चारायची ।  रात्रंदिवस घाम गाळून ,  भाकरीची सोय करायची ॥...4  आईनं दिलेली गरम भाकर ,  आजही मला आठवायची ।  त्या भाकरीच्या पदरात मला ,  आईची माया दिसायची ॥...5 ======================= महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन " गोंदिया =======================

◾कविता :- संकटच स्वानुभवे... | कवी रा. र. वाघ

Image
सं कटच सकलांना क रतात अनुभवी ट वटवी प्रयत्नांना  च तुराई स्वानुभवी स्वा नुभव साधतांना नु रेनाच शान काही भ र पडे शिकतांना वे गळेच ज्ञान काही स बबीने धडपडे ब ळे युक्ती आजमावी ल क्ष्य साध्य असे घडे ता कदीचा जोर लावी आ ज यश मिळे जरी का लचाच ध्यास होता र त होता खास तरी ती व्र असा यत्न होता गु रु बने संकटच रु ळलेल्या वाटेतच रु क्षपण वाटताच पी ळ पडे दंडातच ते च मानी आवाहने मा र्ग शोधी सुटकेचा ना दी लागे प्रयासने वे ध घेई संकटाचा दृ ढ होते मन असे ढ ळेचना धैर्य कदा ज्ञा त होता मनी वसे न कळत स्थैर्य सदा सा तत्याने परीक्षेचे का र्य संकटाचे चाली  र सरुप विरतेचे ती च ठरे खुण भाली निर्मिती:- रा.र.वाघ,धुळे.  मो.नं.७५०७४७०२६१) _____________________________  सदर कविता आवडल्यास नक्की शेअर करा

◾कविता :- राणी लक्ष्मीबाई वर कविता...| List of all the poems that have been written on Rani Laxmi Bai

Image
सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी,  गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,  दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।  चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,  बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,  खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥  कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी,  लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी,  नाना के सँग पढ़ती थी वह, नाना के सँग खेली थी,  बरछी, ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी। वीर शिवाजी की गाथायें उसको याद ज़बानी थी,  बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,  खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥ लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार,  देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार,  नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार,  सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवाड़।  महाराष्ट्र-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी,  बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,  खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥  हुई वीरता की वैभव के साथ सगाई झाँसी में,  ब्याह हुआ रानी ब

प्लास्टिक बंदी वर कविता | Poem on banning use of plastic straw

Image
  सरकारने कितीही वेळा ज री प्लास्टिक बंदी केली  तरी देखील काही काळाने प्लास्टिक पिशवी सुरू झाली... [१] दुष्ट प्लास्टिकचे होत नाही सूक्ष्मजीवांकडून विघटन मातीमध्ये वर्षानुवर्षे पडते तरी होत नाही मातीत पतन... [२] कापडी पिशवी वापरूया करूया प्लास्टिक बंदी कापडी पिशवीच चांगली असो तेजी किंवा मंदी... [३] प्लास्टिक वापरणे सोडून निसर्गाचे करूया रक्षण आपली जबाबदारी निभावू होईल भूमातेचे संवर्धन... [४] चला घेऊ सारे शपथ प्लास्टिक बंदी करण्याची छान, स्वच्छ, सुंदर, हिरवी आपली वसुंधरा घडवण्याची... [५]

कविता लिहण्यासाठी चांगला विषय कोणता | Best topic to choose for poem recitation competition