◾कविता :- आईच्या हाताची भाकरी...
पेटत्या चुलीजवळ बसून ,
भाकरी गरम तव्यावरची ।
त्यात असे आईची माया ,
आग शांत होई खाणाऱ्याची ॥...1
आई भाकरीच्या पीठाला ,
मन लावून मळायची ।
तेव्हाच तर तव्यावर ती ,
आईच्या प्रेमाने फुलायची ॥...2
भाकरी बनवितांना आई ,
जुन्या गितांना सुरात गायची ।
त्यात तिच्या दुःखाची आवाज ,
मला सहज समजून जायची ॥...3
उपाशी लेकराला आई ,
उठवून भाकर चारायची ।
रात्रंदिवस घाम गाळून ,
भाकरीची सोय करायची ॥...4
आईनं दिलेली गरम भाकर ,
आजही मला आठवायची ।
त्या भाकरीच्या पदरात मला ,
आईची माया दिसायची ॥...5
=======================
महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "
गोंदिया
=======================
Comments
Post a Comment
Did you like this blog