◾कविता :- भगवान महावीरांचे जीवन
भगवान महावीरांचे जीवन,
सर्वासाठी प्रेरणादायक आहे ।
राजमहालात राहून सुध्दा,
राजसुखाचा त्याग केला आहे ॥
अहिसेंचे मूर्तिमंत प्रतिक,
चोवीसवे तीर्थकर महावीर झाले ।
आई त्रिशाला वडिल सिध्दार्थ,
यांचे बालपण राजेशाही थाटात गेले ॥
वयाच्या आठव्या वर्षापासून,
शिक्षण व शस्त्रविद्येचे घेऊन धडे ।
श्वेतांबर पंथाच्या नियमाप्रमाणे,
यशोदा यांच्याशी लग्न घडे ॥
संपूर्ण आयुष्य मानव जातीला ,
सत्य आणि अहिसेंचा मार्ग दाखविला ।
आपसात एकजुटीने राहण्यास शिकवून ,
पशुहत्येचा कडाडून विरोध केला ॥
महावीरांनी खूप परीश्रम घेऊन ,
त्यांना ज्ञान प्राप्त झाला ।
जनकल्याणासाठी उपदेश देऊन ,
जैन धर्माचा प्रसार प्रचार केला ॥
*****************************
महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "
गोंदिया
दिनांक : २५/०४/२०२१
-----------------------
Comments
Post a Comment
Did you like this blog