◾News : महासंग्राम " समूहात अनोख्या वैचारिक पद्धतीने मातृदिन यशस्वीपणे साजरा करण्यात आला.

 " महासंग्राम " समूहात अनोख्या वैचारिक पद्धतीने मातृदिन यशस्वीपणे साजरा करण्यात आला.


काल 09 मे 2021 हा दिवस मातृदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. आईसाठी छोटीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी " महासंग्राम " चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संग्राम संतोष सलगर ( आंतरराष्ट्रीय युवा प्रतिनिधी, भारत ) यांनी वैचारिक पद्धतीने मातृदिन हि मोहीम त्यांच्या समूहात राबविली. ह्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ, आदरणीय, पूजनीय तसेच समुहाचे सदस्य देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 11 वाजता झाली. हा लाॅकडाऊनच्या काळात केलेला हा एक आगळावेगळा कार्यक्रम होता.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उत्तराखंडच्या साक्षी जैन मॅडम (कवयित्री, लेखिका), साहेबराव पवार सर (M.A. D.E.D.) तसेच सुचेता भिसे मॅडम म्हणून लाभलेले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख अतिथींची स्वागत करून त्यांचा परिचय करून देण्यात आला. त्यावेळी धनराज गमरे सर यांनी परिचय करून देण्यात सुत्रसंचालकाला मदत केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच साक्षी मॅडम यांनी हिंदीतून काही चारोळ्या सादर केल्या. नंतर त्यांनी इंग्रजीतून आईसाठी कविता सादर केली. त्याच्या ह्या अनोख्या लेखनीस समुहातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच धनराज गमरे सर यांनी पुन्हा एकदा शुभेच्छा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

महासंग्राम चे संस्थापक यांनीही काही कविता आदर केल्या. कवितेचे बोल होते " खरच तीच असते आपली आई ". हळूहळू समुहातून आपले आपले विचार मांडण्यास सुरूवात केली. नंतर प्रमुख अतिथी सुचेता मॅडम यांनीही "आई" नावाची कविता सादर करून चालू परिस्थितीतले अस्तित्व मोजक्याच शब्दात पटवून दिले. तसेच डाॅ. शुभांगी गाडेगावकर मॅडम यांनी युट्युबच्या माध्यमातून कविता सादर केली. तसेच हिंदीतील शायर अत्तार सर यांनी कार्यक्रम मजेदार बनविण्यासाठी काही हिंदीतुन चारोळ्या सादर केल्या.

" लुकलुकत्या चांदण्यांचा 

कैफ आज अंगणात 

जाईल जरी कुठवरही 

वंदनीय तीचे पाय 

माझी माय, माझी माय "

शेवटचे प्रमुख अतिथी साहेबराव पवार सर यांनी विविध कविता आणि बरेच काही एक कृतज्ञता म्हणून सादर केले. ह्या कार्यक्रमाच्या वेळी विपुल गोसावी (राष्ट्रीय व्हालीबाॅल खेळाडू), श्रध्दा चोबे मॅडम, आशिष मेटकरी (राष्ट्रीय बाॅक्सींग खेळाडू), बाळू नांगरे सर, रेखा बागुल मॅडम (प्रसिद्ध लेखिका, शिक्षक), दिपाली मारोटकर (कवयित्री), श्रीधर नंदीवाले, सुहास खंडागळे, अथर्व धोत्रे, इत्यादी तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

अशा अनोख्या वैचारिक पद्धतीने महासंग्राम समूहात मातृदिन साजरा झाला. अखेरीस मा. श्री. संग्राम सलगर यांनी सर्वांचे आभार माणून वैचारिक मातृदिन कार्यक्रम समाप्त झाला असे जाहीर केले.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !