◾कविता :- ग्रामनिर्माण

गावाला कराया सुखी शांती , 

मिटवून कुटील , दृष्ट जातील । 
गावकऱ्यांचा संघटन मजबुत करुन , 
गावाला नंदनवन करता येईल || 

त्यागी व निधडयांना पुढारी करावे
लोकांनी आपले दुःख त्यांना सांगावे । 
अपराध्यांना समजवून शिक्षा करुन , 
त्याला गावासाठी वठणीवर आणावे ॥ 

दया क्षमा शांती निर्भयता असावी , 
जीव गेला तरी निर्दयी नसावे । 
जिथे निर्दयीपणाची गरज असावी , 
तिथे मन दगडापेक्षाही कठिण असावे ॥ 
दयाधर्म , दानधर्म रहस्य जानून घ्यावे , 
लोकांना ओळखून जवळ घेऊ नये । 

चोरांना , कामचोर बुवांना , ऐतखाऊंना,
कधी दानधर्म करु नये ॥ 
समाजद्रोह्यांचे करुनी दमन , 
सज्ज करु या संरक्षण । 

दुष्ट, बदमाशाला करुन प्रतिकार , 
गरीबास द्यावे गौरव नि सन्मान ॥ 
जो बंधुभावाने सर्वाशी वागतो , 
सुखाच्या वेळीही अहंकार टाळतो । 
आपत्तीतही संयमाने वागतो ,
अशा लोकांनीच ग्रामनिर्माण होतो ॥ 
-----------------------

महेन्द्र सोनेवाने , “यशोमन"

गोंदिया

दिनांक : ३०/०४/२०२१

----------–------------

____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...