◾कविता :- पाऊस....

 पाऊस....

तु येणार आहेस का

आलास तर जरा सावकाश ये

शेतकऱ्यांची काळजी घे

ते आधीच नैराश्यात जगताय

खुप अपेक्षेने तुझी वाट बघताय


अरे पावसा......

कितीही हात उसणवारी

केली तरी शिल्लक काहीच रहात नाही 

चुलीवरच्या पातेल्यात

काय शिजतय

येवून कोणी पहात नाही


बरका पाऊस......

तू जर वेळेवर आलास ना

तर त्यांच्याही आयुष्याच नंदनवन होईल

सतत रडणाऱ्या चेहऱ्यावर 

एकदातरी हसु येईल


अरे पावसा.......

कधीतरी शेकऱ्यानाही

श्रीमंतासारख जगू दे

त्याचेही खळेमळे

धनधान्यांनी भरू दे

तुला सांगतो पाठीवर हात ठेवून खोट्या सहानुभूतीचा फोटो पेपरच्या पहिल्या पानावर शेतकऱ्यांना नको असतो

त्यांच्या शेतमालाला हमीभाव हवा असतो


पण सायरन वाजत त्या बगळ्यांची गाडी येते

भुर्रकन निघून जाते

न मिळणाऱ्या मदतीची  मात्र टीव्हीवर ठळक बातमी असते


 ऐकना पावसा.......

तू  अवकाळी येवू नकोस 

एकही शेतकऱ्याला

उपाशी मारू नकोस

त्याच्या पोटाला भाकर मिळाली ना की ते

शेतात राबराब राबतील

बघ मग कसं मातीतून सोनं उगवतील


म्हणून म्हणतो पावसा जरा समजून घे ना

एकदा तुझी मुसळधार बरसात होवू दे

तुझ्यामुळे त्यांच्या कष्टाच्या घामाने

शेतीमातीला सुगंध येईल

मग तेव्हाकुठे त्यांच्या 

झोपडीतला अंधार दुरं होईल


मग काय पाऊस.....

तू येशीलना 

आलास तर सावकाश ये

येताना आनंद घेवून ये

माझ्यासाठी नाही रे...

शेतकऱ्यांसाठी म्हणतो मी


*संजय धनगव्हाळ*

९४२२८९२६१८

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...