◾कविता :- पेरा
कविता: पेरा
__________________________
मंजुळ वारा मोर पिसारा ,लांडोर नाच करी !
रिप रिप बरसात करती, पावसाच्या सरी !!
ढगांची गर्दी देतात वर्दी ,नभात करी आवाज !
लखलखणारी विज चढवी ,नभी सोनेरी साज!!
आकाश निळे ढग काळे ,चोहीकडे अंधार !
गर्जनेची तोफ धडधडे ,जीव करी बेजार !!
आसा लागतो पाऊस , करीतो पाणी पाणी !
बांध फोडुनी सडा टाकितो, रानी आणि वनी!!
रिपरिप हाआवाज सरींचा ,थेंब टपोरे जरी !
त्या थेंबातुन चालत आसते, पेरणीची कुरी !!
मृगामधे साधुन पेरा ,बळी परतला घरी !
पेरले ते उगवणार का ?भीती रहाते ऊरी !!
अति बरसला नाही बरसला, बनतो हा काळ !
कधी ओला तर कधी कोरडा ,पाडीतो दुष्काळ !!
आता मागणे एक आमचे ,साधु दे हा पेरा !
कोप नको हा तुझा आम्हावर ,साथ दे जरा !!
रचना
संतराम पाटील
केनवडे ता.कागल जि कोल्हापूर
मो.नं 9096769554
Comments
Post a Comment
Did you like this blog