◾कविता :- हिम
हिम
शुभ्र नाजुक हिम पांढरा
वाटे ओंजळीत घ्यावे जरा
स्पर्श हा गुळगुळीत
बर्फ हा घेता मुठीत
लगेच वितळे सारा
क्षणात पाणी बर्फाचे
रुपांतर अवस्थेचे
न थांबे हे कधी जरा
होईल काय क्षणांत
रुपांतर पाण्याचे बर्फात
मनी येई जरा जरा
बर्फ हे जीवन जणू
कधी संपे काय म्हणू
या हव्याशा क्षणभंगुरा
रमा शिरसे
Comments
Post a Comment
Did you like this blog