◾ कविता :- हाक पावसाला ...
कविता
.हाक $$$ पावसाला .....
जेंव्हा उन्हाळा बदलतो कुस
तेंव्हा लागायचा आसतो पाऊस ...
कधी वादळ आणि सोसाट्याचा वारा
कधी बरसतो रिमझिम, कधी फक्त गारा ...
सुटतो मातीचा सुगंध नासिकेत दरवळ
अचानक पडतो धो धो नुसती पानगळ ....
कधी उडवतो घराचे छप्पर आणि पत्रे सुद्धा
रौद्ररूपी वादळाने वृक्ष हलवी गदा गदा ...
होते ढगफुटी नुसता विजेचा थरार
कडाडणारी विज करते अनेका निराधार ....
काळ्या काळ्या ढगांची जमीनीला ओढ
पेरलेल्या बियाना येती कोवळं कोवळं मोड ...
तहानलेली धरती साद घालीते पावसा
भेगाळला आहे देह माझा ,लाग रात्र दिसा ....
कुणब्या घरी पावसाळा, सुरू होतो जेंव्हा
गळत्या घरी राहुन म्हणे ,पाऊसच हवा ....
पाणीच पाणी चोहीकडे नदी नाल्याला पुर
येरे येरे मेघराजा जाऊ नको दुर दुर ....
रचना
संतराम पाटील
केनवडे ता.कागल जि कोल्हापूर
मो.नं 9096769554
Comments
Post a Comment
Did you like this blog