◾कविता :- पर्यावरण

            पर्यावरण            

जागतिक पर्यावरण दिन , 

सर्वानी साजरा करुया । 

सर्वाच्या सुखी जीवनासाठी , 

जागोजागी झाडे लावूया ॥ 


निसर्ग आणि पर्यावरण , 

हाच आमचा खरा मित्र आहे । 

नैसर्गिक गोष्टींचा वापर करा , 

महती पर्यावरणाची आहे || 


स्वच्छता ठेवा गलोगल्लीत , 

निसर्ग चक्र चालेल सुरळीत । 

सुरुवात पर्यावरण रक्षणाची , 

आनंद पसरेल जगभरात ॥ 


पुढच्या पिढीसाठी करु आसरा , 

फळांच्या बीया पर्यावरणात पसरा । 

दारी राही वृक्षांचा पहारा , 

तेव्हाच पशुपक्षांना देऊ सहारा || 


उन्हात हवी असेल सावली , 

तर वृक्ष लावा पावलोपावली । 

अंगणात लावा वृक्षवेली , 

हिच आरोग्याची गुरुकिल्ली || 


पर्यावरणाची केली हानी , 

तर होते मनुष्य जीवनाची हानी । 

म्हणून वृक्ष लावा घरोघरी , 

तेव्हाच पर्यावरण असेल जीवनी ॥ 


=======================


महेन्द्र सोनेवाने “ यशोमन "

गोंदिया

 दिनांक : ०१/०५/२०२१

=======================

Comments