◾कविता :- मिळेल का?लस

 कविता  : मिळेल का?लस 


कोरोणाच्या महामारीत ,गेल वरीस सरल ...

रोगराईच्या दहशतीने ,जग सारं हादरल !!

एक घडीचा डाव सारा ,गतवर्षी बिघडला ...

होळीच्या महिन्यात ,जगाचा गाडा आडला !!

जगभरात आली मंदी ,माणूस ही नडला ....

रोजगार गेला बेकार आली ,जगण्यात नाही रस !!

मिळेल का ?साहेब ....रोजगाराची लस //1//

शाळा नाही अभ्यास बंद ,घरात भुकेली पोर 

टाळेबंदी साठेबाजी, चढला  महागाईचा जोर !!

पैसा नाही वस्तू नाही ,एकवेळचा उपास 

घरातच झालो बंदीजन, मोकळा नाही श्वास!!

घरदार लेकर उपाशी ,मनही  झाले नरवस

मिळेल का?साहेब ...पोटभरायची लस //2//

घरभाडे वीजबील गॅस टीव्ही, बॅलन्स राशीला 

सरकारी देणी ना थांबली, पुजलेत पाचवीला !!

अश्वासनं बहु झाली,पावलं सरकार नवसाला 

व्यवहार सारे झाले बंद ,महाग झालो पैशाला !! दारिद्र्य आलय पैसा नाही, बंद झाली नस 

मिळेल का ? साहेब...पैसा मिळायची लस //3//

चार टप्पे समजून ही, यंत्रणा का थांबली 

नजिक धोका आसतानाही ,लस का लांबली!!

श्रीमंत लोळतो गादीवर ,गादी खाली पैसा 

आम्हालाच नाही आता उद्याचा भरवसा!!

एक उपाशी एक तुपाशी, झालीया निराशा 

सत्तेवरच्या राजाला ,चढली सत्तेची नशा !!

जगता जरी आले तरी ,तेवढंच होईल बस 

मिळेल का ?साहेब ...माणुसकीची लस //4//


रचना 

संतराम पाटील 

केनवडे ता.कागल जि. कोल्हापूर 

9096769554,9420339554

Comments

Popular posts from this blog

कविता :- आतुरता

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे...

◾जीवन परिचय :- राम गणेश गडकरी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾कविता :- नवरा माझा

जिवन विचार - 52