◾ कविता :- भेट दे श्रीहरी
कविता
भेट दे श्रीहरी
पुंडलिकाच्या विटेवरी ,थांबलास पंढरपूरी !
नाही चुकली एकादशी ,आषाढीची वारी !!
झाला विषाणूचा कोप ,हादरली दुनिया सारी !
गळ्यात माळ हातात टाळ ,मृदुंग विनाधारी !!
का ?चाललास दुर दुर ,मी तुझा माळकरी !
सांग मला भेटशील का रे ,माझ्या सावळ्या श्रीहरी //1//
उद्योग व्यापार झाला चालू, तिथं नाही विषाणु !
भरला तुडुंब कुंभ मेळा ,जमले नाही किटाणु !!
निवडणूक होते तेंव्हा ,कोरोणा जातो रजेवर !
हौसे नवसे पोटभरू, खिरापत खाती पोटभर !!
कोसो मैल दुर तुझ्या मी , दुर तुझी ती पंढरी !
भेटीसाठी अतुर झालो ,माझ्या सावळ्या श्रीहरी//2//
तुच माय नी तुच बाप ,चाललासी तु दुर दुर !
हृदयमंदीरी तु आहेस,गवसत नाही मला सुर!!
वैष्णवजन अतुर होऊन , सदा घेती गळा भेटी !
थकले नव्हते हे पाय ,आसुसले तुझ्या साठी !!
पडे दुष्काळ आला महापुर, चुकली नाही वारी!
दिंड्या पताका घेऊन आलो , भेट सावळ्या श्रीहरी//3//
रमत नाही मन माझे वेळ जात नाही घरी !
माय माझी चंद्रभागा ,चंद्रकोरी मंदिरी !!...आता
घर झालय पंढरपूर ,घरी भेटते रखुमाई!
भेट देरे विठुराया ,भक्ताना झाली घाई !!
ठाई ठाई रूप लोचनी ,दृष्टी ठेव जगावरी !
सांग मला कधी भेटशील,माझ्या सावळ्या श्रीहरी//4//
रचना
संतराम पाटील
केनवडे ता कागल जि कोल्हापूर
मो.नं 9096769554,9420339554
Comments
Post a Comment
Did you like this blog