◾कविता :- लेक सासरी जाते तेव्हा
लेक सासरी जाते तेव्हा
बापाला वाटतं
माझे काळीज
माझ्यापासून दुर गेले
माझ्या देहातले
एक घर रिकामे झाले
लेक सासरी गेल्यावर
आईचे मनही हळवे होत असते
शोकेसमधली खेळणी पाहून
लेकीच्या आठवणीत दिसते
लेक सासरी जाताना
हसरा चेहरा आईचा
कधी रडका कधी भावनिक दिसतो
तेंव्हा मात्र
बापाच्या डोळ्यात
अश्रुंचा पाऊस असतो
आईबाबांचा हात सोडून
लेक तिच्या घरी जाते तेव्हा....
आई चारचौघात रडून घेत असते
बापाला रडायला मात्र
एकांताशिवाय दुसरी जागाच नसते
लेक सासरी असताना माहेराचे आंगण लेकीवाचून सुने सुने होते
ती गेल्यावर तिच्यामुळे सासरचे घर शेभून दिसते
लेकीने मोठ होवू नये
घर सोडून तिने जावू नये
अस प्रत्येक आईबाबांना वाटत असते
पण नाही...
ती माहेरा ची लेक आणि
सासरची सून असते
म्हणून तिला जावचं लागतं..
*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८
Comments
Post a Comment
Did you like this blog