◾कविता :- शेकारणी
12) कविता -शेकारणी
शेकारणी
नेमीच येतो मग पावसाळा,घेऊन नवा सोहळा .
पावसाळ्यात लागतील ,गळती घरे सांभाळा .
चिखल मातीच घर ,त्याला साध्या कौलाचा छत.
फक्त निवारा निवसी ,उभा संसाराचा रथ .
करून घराची शेकरणी गळती काढु नकळत....
गळती लागलेत घराला ,पीचल्या पावळणीला .
कोड पडलय मला, नी माझ्या परिवाराला .
गळतं लागलय मनाला ,गांजलेल्या परिस्थितीला.
ठिगळं लावावं जसं, फाटलेल्या सदर्याला .
फाटल्या संसाराची, गळती काढु नकळत.....
पडल्या पावसाचं पाणी ,मनाहुन निर्मळ .
पडलं जरी आढ्यावर, वळचणीला खळखळ .
गढूळ जरी वाटलं तरी, काही वेळात निवळे .
हे काही कसं ,आमच्या मनाला न कळे .
गढूळ झाल्या मनाची, गळती काढु नकळत....
पहील्या पावसात, काढुया चला गळती .
परिस्थितीची ,संसाराची ,चंचल मनाची .
संस्कृतीची, संस्कारांची ,गंजल्या बुद्धीची .
माणसातील रूजलेल्या, अदृश्य सैतानाची .
अमानुष वृतीची ,विकृतीची ,गळती काढु नकळत.....करून शेकारणी ,वास्तव स्वरूपाची...
रचना
संतराम पाटील
केनवडे,कागल मो नं 9096769554
Comments
Post a Comment
Did you like this blog