◾कविता :- जीभेची चोचले
'
जीभेची चोचले'
****************
कुठे काही चमचमीत
दिसले की
तोंडाला पाणी सुटतं
किती खावे किती नाही
असं जीभेला खुप वाटतं
जीभेवर लाळ घेळताना
चोचले तिचे पुरवावेच लागतात
गरमागरम खाताना
तोंड फुगवते
जीभ जळली की मग
घटाघटा पाणी प्यायचं
हाश हूश करताना
डोळ्यातलं पाणी पुसायचं
मस्त मस्त खाण्यासाठी जीभ लई चभरं चभरं चालते
चटपटीत पाहून कशी ती गोडं गोडं बोलते
मनासारखं झाल की
जीभेची मजाच असते
नविन नविन चव चाखून
लालबुंद दिसते
खाऊन झाल्यावर
थंडगार पेय पिऊन
जीभ तिचा जळकेपणा
शांत करते
मोठ्या फुशारकीने
मगं ती होठावरून फिरते
तिला जर नाही दिले
तर मग ति घसरल्यावर कोणाच ऐकत नाही
तिचे लाड पुरवल्याशिवाय
ती स्वस्थ बसतं नाही
*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९२६१८
Comments
Post a Comment
Did you like this blog