काही कटू सुविचार

 


💐💐

*अशा माणसांबरोबर राहा,जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की, जे इतर माणसांबद्दल बोलतात. एकमेकांना आधार देणे हे सुद्धा एखाद्या औषधापेक्षा जास्त गुणकारी असते..कदाचित आपण दिलेला आधार कोणालातरी आशेची नवीन उमेद देईल... काही माणसं मैत्रीने खांद्यावर हात टाकतात दु:खातही कायम साथ देतात.*

                      

 🎯 *काही माणसं गजबजलेल्या शहरासारखी असतात, गरज पडली तरच आपला विचार करतात. बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.* 

💐 *मात्र काही माणसं, पिंपळाच्या पानांसारखी असतात. जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवतात...*                                                                     

          

 *नात्यांना अर्थ येतो तो एकमेकाला समजून घेतल्यामुळे. समजून घेतल्यामुळे मैत्री जडते. एक माणूस उलगडत जातो. मोकळा होतो.  एक मुखवटा गळून पडतो तो कदाचित आपलाही असतो.*

*काही कामं खिशात हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्या चिल्लर मुळे अडून राहतात*


*म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.*

       

   *कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही.. आणि यशस्वी होणारे लोकं "कारणं" सांगत नाही...!!!*

 *जिंकायची मजा तेव्हाच आहे. जेव्हा अनेकजण तुमच्या "पराभवाची" आतुरतेने वाट पाहत असतात !! वेळेला वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला कि चांगली वेळ यायला वेळ लागत नाही ..*


👍 *जगताना स्वतःच्या बोलण्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा कि वाईट लोकांना त्याचा ठसका आणि चांगल्या लोकांना त्याचा गोडवा लागला पाहिजे...*


*निंदा व टीका आयुष्यात वाट्याला येईलच. जर रोजचं स्तुती झाली , तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्टाच्या दिशेला जातो. माणसाचा सर्वात चांगला सहकारी,त्याची प्रकृती आहे... प्रकृतीची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो... म्हणूनच आपल्या प्रकृती कडे लक्ष द्या,व सुखाने जगा..*


🎯 *आयुष्यात दोन व्यक्तींपासून लांब रहावे. एक व्यस्त, आणि दुसरा गर्विष्ठ.*

*कारण व्यस्त माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलणार, आणि गर्विष्ठ माणूस त्याच्या मतलबानुसार,आठवण काढणार...!!* 


   *कुणाच्याही मागे जास्त धावू नका, तुमची किंमत कमी होईल.* 

*कारण आपण ज्याला जास्त महत्त्व देतो, त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते...!!*


 😇  *खोटी व्यक्ती कितीही  गोड बोलली, तरीही एक दिवस ती तुमच्यासाठी " बिमारी " बनणार, हे मात्र नक्की.*

 👉 *परंतु खरी व्यक्ती कितीही कडू वाटली, तरी एक दिवस ती तुमच्यासाठी " औषधी " बनून, तुमच्या कामाला येणार. ही गोष्ट मात्र पक्की...!!*


   *डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो. आणि तोच, दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळं करतो.*


*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या.*

💐🌸♦️💐🌸♦️💐🌸♦️

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...