कविता :- दिवाळी
"दिवाळी""
लखलखत्या आकाशी
शोभे दिव्यांचा हार,
जैसी चांदण्यात
नटली नटरंगी नार,
आतषबाजीने फटाक्यांच्या
धरणीने केला शुंगार,
पाहुन तिचा थाट,
अंधारानंही फिरवली पाठ,
दिवाळीत ह्या,
तेवुन मना-मनात भावनांचे दिवे,
प्रकाशात त्या,
पाहू एक स्वप्न नवे,
सोडून देवु ,
ऋणानुबंधाचे ते जुनेच हेवे-दावे,
दिपावलीत दिव्यातलं तेल,
फुलविती आयुष्याची वेल,
आरोगयाचा मंत्र, धन्यांचा हार,
खोलते धनोत्रयीच्या दिवशी लक्षमीचे दार,
सजली सुरांची पहाट,
सुवासिनींच्या मांगल्याचे घाट,
शिंपडून अंगणी सडा, रांगोळी,
पतिराजावर प्रीत आपली ओवाळी,
मंगेश शिवलाल बरई.
Comments
Post a Comment
Did you like this blog